This article has been published in Dainik Pratyaksha on 29th April 2011. The article talks about various available Office Applications and suites which are Freewares. Recollecting about Office Apps / softwares and their uses, I recollect Sadguru Aniruddha Bapu once explaining us during a seminar about making of a website using a simple Word file and it was a shock! But I am no longer a stranger to shocks like these. I all the seminars that we have had with Bapu, He has always been giving us totally innovative ingenuous tips, tricks and solutions. Anyways... let us now proceed to our subject.
ऑफिस-ऑफिस
काही दिवसांपूर्वी एका क्लायंट कडे
गेलो होतो. तेथे असताना मला चटकन एक डॉक्युमेंट बनवायचे होतो. त्यासाठी त्यांनी मला
एक कॉंप्युटर दिला. पण या कॉंप्युटरची ऑपरेटींग सिस्टिम व ह्या संगणकावरचे ऑफिस सॉफ्टवेअर
सूट हे आपण सर्वसाधारण पणे वापरत असलेल्या मायक्रोसॉफ्ट ऑपरेटींग सिस्टिम (ओ.एस.) विंडोज पेक्षा
वेगळे होते. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा कळले की त्यांची ऑपरेटींग सिस्टिम
लिनक्स व ऑफिस सॉफ्टवेअर सूट ओपन ऑफिस होते. त्यानंतर त्यांनी एक मोठा धक्काच दिला.
ज्या ओ.एस. व ऑफिसच्या सूटसाठी एक साधारण १५-२० माणसांच्या कंपनीला काही हजारात खर्च
येतो तिच ओ.एस. व ऑफिस सूट हे ह्या क्लायंटच्या कंपनीला संपूर्णपणे मोफत मिळाले होते.
हाच आपल्या आजच्या आपल्या भागाचा विषय हा मोफत ऑफिस सॉफ्टवेअर सूटस् आहे.
ऑफिस सॉफ्टवेअर सूटला काही वेळेस
प्रॉडक्टिव्हिटी सूट असे ही म्हणतात. उदाहरणच द्यायचे झाले तर वर्ड, एक्सेल, पॉवर-पॉइंट,
नोटपॅड इत्यादी प्रोग्रॅमस् वापरून आपण जी डॉक्युमेंटस् तयार करतो, ती ऑफिस सॉफ्टवेअर
सूटमध्ये मोडतात. मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस सूटस्मध्ये मायक्रोसॉफ्टचा सूट सर्वात वापरला
जाणारा आहे. पण मायक्रोसॉफ्टचे सर्वात बेसिक ऍप्लिकेशन हे साधारणत: अडीच-तीन हजार रुपयांच्या
आसपास मिळते. त्यामुळे आपण उपलब्ध असलेल्या काही मोफत ऑफिस सूटस्बद्दल जाणून घेऊ या. http://office.live.com, www.openoffice.org इत्यादि साईट्स् व ऍप्लिकेशन्स्चा उपयोग करुन आपण ऑफिस सूटच्या सर्व
मुख्य सुविधांचा फायदे घेऊ शकतो.
http://office.live.com
वर उल्लेखिल्याप्रमाणे आपण जाणून घेतलेच आहे की मायक्रोसॉफ्टचे बेसिक एडिशन हे मोफत नाही. पण मायक्रोसॉफ्टचे आपले एक मर्यादित, ऑनलाईन संस्करण (व्हर्जन) काढले आहे ज्याचे नाव लाईव्ह ऑफिस असे आहे. ह्यामध्ये आपण वर्ड, एक्सेल, पॉवर-पॉइंट व वननोट ही चार साधारणत: वापरली जाणारी डॉक्युमेंट्स ऑनलाईन बनवू व वापरू शकतो.

आवश्यक कॉन्फिगरेशन
काही साईट वापरण्यासाठी आपल्याला आपले हॉटमेल किंवा विंडोज् लाईव्हचे खाते असणे गरजेचे असते (हे खाते मोफत उघडता येते). ह्या व्हर्जनला ऑफिस लाईव्ह सूट असे म्हणतात. ह्या व्हर्जनमध्ये मायक्रोसॉफ्टच्या बेसिक एडिशनच्या तुलनेत फक्त काही प्रगत फिचर्स नाहीत (ज्यांची साधारणत: गरज नसते). ह्या साईटचा एक अतिरिक्त उपयोग म्हणजे कोणतेही ऑनलाईन बनवलेले डॉक्युमेंट आपण ऑफलाइन असतानाही पाहू शकतो. पण त्यासाठी आपल्या संगणकावर लाईव्ह ऑफिस सूट इन्स्टॉल्ड असणे गरजेचे असते. त्याशिवाय जर आपण मायक्रोसॉफ्टचेच सिल्व्हरलाईट हे फ्रेमवर्क इन्स्टॉल केलेले असेल तर आपल्याला डॉक्युमेंट्स जास्त चांगली व लवकर दिसू शकतात.
आपली डॉक्युमेंट्स व्यवस्थित साठवण्यासाठी आपल्याला आपल्याला ह्या साईटवरच्या खात्यात फोल्डर्स् बनवता येतात. आपण बनवलेल्या डॉक्युमेंट्स दुसर्यांनी बघण्याचा अधिकार आपण ठरवू शकतो. त्यामुळे ही डॉक्युमेंट्स आपल्या व्यतिरिक्त आपल्या खात्यातील आपल्या संपर्क यादीतीला संपर्कांना किंवा इतर सगळ्यांना दिसण्याची किंवा न-दिसण्याची व्यवस्था आपल्याला करता येते. या साईटवर आपण फोटोज् अपलोड करू शकतो. हे फोटोचे विविध अल्बम्स देखील आपण बनवू शकतो. ह्या आपल्या ऑफिस लाईव्ह खात्यात आपला हॉटमेल व विंडोज् मेसेंजरचा अकाऊंटही इंटिग्रेट केलेला असतो. ही सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन सेव होतात. ती आपण आपल्या संगणकावरही डाऊनलोड करू शकतो. ही साईट वापरताना आपल्याला काही वेळेस डॉक्युमेंट्स न उघडण्याची असुविधा होऊ शकते. त्यावेळेस आपण आपल्या ब्राऊझरमधील ऍडऑनस् रन करण्याची अनुमती द्यावी लागते.
www.openoffice.org
हल्ली सुरू झालेल्या ओपन-सोर्सच्या (फ्रीवेअर) जमान्यात, कॉर्पोरेट जगतात सर्वात प्रचलित असणारा ऑफिस सूट म्हणजे ओपन ऑफिस (www.openoffice.org). ह्या ओपन ऑफिसने मायक्रोसॉफ्टच्या विंडोजसाठी चांगलीच स्पर्धा निर्माण केली आहे. ह्या ओपन ऑफिस सूटला लायसन्स लागत नाही, म्हणजेच हा एक मोफत ऑफिस सूट आहे. विंडोजसारखे आपण ह्यावर ऑफलाईनही काम करू शकतो www.openoffice.org ह्याच साईटवरील डाऊनलोड सेक्शन आपण ह्या प्रोग्रॅमची एक्झीक्यूटेबल फाईल डाऊनलोड करून मग इन्स्टॉल करू शकतो. त्यानंतर जसे आपण मायक्रोसॉफ्टच्या विविध व्हर्जनस् (उदा: एक्स.पी., २००३, २००७ इत्यादी) मध्ये जशी विविध प्रकारची उदा: वर्ड, एक्सेल, पॉवर-पॉइंट, नोटपॅड डॉक्युमेंट्स बनवतो व वापरतो, त्याचप्रमाणे आपण ओपन ऑफिसमध्येही ती बनवू व वापरू शकतो. त्याशिवाय मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये तयार केलेली डॉक्युमेंट्ससुद्धा ओपन ऑफिसमध्ये वाचता व त्यावर कामही करता येते.

इतर ऑफिस सूटस् - ओपन ऑफिस व लाईव्ह ऑफिसच्या व्यतिरिक्त अनेक इतर ऑफिस सूटस्सुध्दा उपलब्ध आहेत. फेंग ऑफिस, निओ-ऑफिस, जीनोम ऑफिस, लायबर ऑफिस हे ओपन-सोर्स (फ्रीवेअर) म्हणजेच मोफत ऑफिस सूटस् आहेत. मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या व्यतिरिक्त ही इतर अनेक मूल्यांकित ऑफिस सूटस् उपलब्ध आहेत उदा: ऍबिलिटी ऑफिस, सेलफ्रेम ऑफिस, ब्रेडबॉक्स ऑफिस, शेअर ऑफिस, इत्यादि.
गुगलचे डॉक्स् हेही अत्यंत उपयुक्त, मोफत व ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. शिवाय गुगल डॉक्स् हे जीमेल मध्येच एकत्रित केलेला आहे व जी-मेल मधील ऍटॉचमेंट्स थेट गुगल डॉक्स्मध्येच जोडल्या जातात. त्याशिवाय गुगल डॉक्स् हे ऑनलाईन असल्यामुळे त्यातील डॉक्युमेंटवर कुठून ही काम करता येते.
0 comments:
Post a Comment