latest Post

वाहनांच्या इत्यंभूत माहितीसाठी संकेतस्थळे

I am publishing the 8th article from the my series on Freewares in Dainik Pratyaksha. The article is on various car deal portals where we can sale and purchase new and used cars. You would also find some sites for car pools. This article had featured in the issue of Pratyaksha dated 7th January 2011.



वाहनांच्या इत्यंभूत माहितीसाठी संकेतस्थळे


भारतीय मोटर उद्योग हा आज जगातील इतर देशांच्या मोटर उद्योगांमध्ये दुसरा सर्वात मोठा उद्योग मानला जातो व भारत आता दर वर्षी ८० लाख मोटारी उत्पादित करत आहे. एका अंदाजानुसार, फक्त पुढच्या ४० वर्षातच, म्हणजे २०५० साला पर्यंत भारतीय मोटर उद्योग जगातील दुसर्‍या क्रमांकावरुन पहिल्या क्रमांकावर पोहोचेल व त्यावेळेस भारतातील फक्त गाड्यांची संख्या ६११ दशलक्ष एवढी असेल. शिवाय भारतात नुकतीच टाटा समूहाने ’नॅनो’ ही फक्त एक लाख रुपयांची मोटर उतरवली व अगदी सामान्य माणूस ही मोटारीत बसून फिरण्याची स्वप्‍ने पाहू लागला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील ७०% लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील आहे व हाच वर्ग सर्वात महत्त्वाकांक्षी असतो व मोटारींची आवडही त्यांच वर्गाला सर्वात जास्त असते.

वरील प्रस्तावना वाचून आपण ताडलच असेल की आज आपण मोटारीं विषयीच्या संकेतस्थळांबद्दल जाणून घेणार आहोत. www.carwale.com,  www.indiadrive.com, www.gaadi.com, www.automobileindia.com, www.carazoo.com, www.autoindia.com ही व अशी अनेक संकेतस्थळं आहेत जेथे आपल्याला मोटारीं विषयी विविध माहिती व अजून ’बरेच काही’ उपलब्ध करुन दिले जाते. ही माहिती कोणत्या प्रकारची असते व हे ’बरेच काही’ म्हणजे नक्की काय ते आता आपण जाणून घेऊया.

ह्या संकेतस्थळांवर आपण नवीन किंवा वापरलेली (सेकंडहॅण्ड) गाडी किवां बाईकची (आपण येथे मोटर असे या दोघांना संबोधुया) खरेदी किंवा विक्री करु शकतो व त्या बद्दल मार्गदर्शन मिळवू शकतो. नवीन मोटर खरेदी करण्याचे मार्गदर्शन आपल्याला या संकेतस्थळांवर मिळते. ते मिळवण्यासाठी ह्या संकेतस्थळांवर आपल्याला काही प्र
श्‍नांची उत्तरे द्याची असतात उदा. आपली खर्च करण्याची तयारी (बजेट), आपल्याला हवी असलेली कंपनी, कंपनीचा ब्रॅंड, आपल्याला हव्या असलेल्या सुविधा, आपल्या मोटारीत किती माणसे बसणार, पेट्रोल / डिझेल / एल.पी.जी. वर चालणारी, इत्यादी. ह्या प्रश्‍नांबरोबर आपण मोटारीच्या कुठल्या गुणधर्माला (उदा: इंधन वापर व बचत, पुनविक्री मूल्य, आराम, सुरक्षा, इत्यादी) प्राधान्य देतो ते ही निवडायचे असते की मग आपल्या बजेटमध्ये बसणारी, आपल्याला हव्या असणार्‍या सुविधा असणारी व आपल्याला हव्या असणार्‍या गुणधर्मांची, कोणत्या कंपनीची मोटर आहेत त्याचा एक तख्ताच आपल्या समोर उघडतो, ज्याच्यामध्ये या मोटारींचे फोटो ही असतात. ह्या तख्त्यावरुन आपण कोणती मोटर घ्यायची त्याचा निर्णय घेणे आपल्याला सोपे जाऊ शकते. शिवाय आपल्याला विशिष्ठ मोटारींचे अंदाजपत्रक (कोटेशन) संपूर्ण किंमती सगट, (विमा, आर.टी.ओ. प्रभार, इत्यादींसह) म्हणजेच ’ऑन रोड प्राइज’ सहित मिळते.

जर आपण वापरलेल्या (सेकंडहॅण्ड) मोटारींच्या शोधात असू तर आपल्याला वरिल उल्लेखिलेल्या प्र
श्‍नांबरोबरच अजून काही प्रश्‍नांची उत्तरे द्याची असतात उदा: आपण राहणार्‍या शहराचे नाव द्यावे लागते (जेणेकरुन आपल्याला आपल्या शहरातीलच मोटर मिळू शकेल), मोटारीचा रंग, इत्यादी. वापरलेली (सेकंडहॅण्ड) मोटारी विकत घेताना इतरांनी नोंदविलेल्या मोटारींची यादी ही आपल्याला येथे मिळते. जर त्या नोंदविलेल्या मोटारी आपल्याला पसंत असतील तर आपण तसे सूचित करु शकतो, जेणे करुन त्या मोटारींचे मालकं आपल्याला संपर्क करु शकतात.

आपली मोटर विकायची असेल तरीही ह्या संकेतस्थळांची आपल्याला मदत होऊ शकते. आपण राहणारे शहर, मोटर बनवली गेल्याचे वर्ष, मोटारीचे मॉडेल, संस्करण (व्हर्जन) व आपल्या मोटारीने केलेला एकूण किलोमीटरचा प्रवास ह्या सा
र्‍या, प्रश्‍नांची उत्तरे दिली की आपल्याला आपल्या मोटारीचे पुर्नविक्री मूल्य कळते. या संकेतस्थळांवर आपण आपली मोटरीची माहिती पुर्नविक्रीसाठी (रीसेल) नोंदवू शकतो. त्यासाठी आपल्याला आपले खाते या संकेतस्थळांवर उघडावे लागते जे मोफत उघडले जाऊ शकते. नोंदणी करताना आपल्याला आपल्या मोटारीबद्दल काही माहिती पुरवावी लागते उदा: आपण राहणारे शहर, मोटर बनवली गेल्याचे वर्ष, मोटारीचे नाव, आपल्या मोटारीने केलेला एकूण किलोमीटरचा प्रवास, रंग, इत्यादी. शिवाय स्वत:बद्दलची माहिती ही संकेतस्थळांवर द्यावी लागते (उदा: आपले नाव, भ्रमणध्वनि (मोबाईल क्रंमांक) व इमेलचा पत्ता) जेणेकरुन खरेदीदार आपल्याला संपर्क करु शकतील. त्याच बरोबर आपल्या शहरातील वापरलेली (सेकंडहॅण्ड) मोटारींचे विक्रेत्यांबद्दल (डीलर्स) ही आपल्याला माहिती मिळते.

मोटार विकत घेताना आपल्याला लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. या संकेतस्थळांवर आपल्याला आपण जर कर्ज घेतलेच तर आपल्याला लागणारा बँकेचा मासिक हफ्त्याची रक्कमही अनुवादून (कॅलक्यूलेट करुन) समजते. ही आकडेवारी कळण्यासाठी आपल्याला आपण घेणार असलेल्या कर्जाची रक्कम व कर्जाचे व्याजदर नमूद करावे लागते. त्याशिवाय आपल्याला या संकेतस्थळांवर विविध बँकांचे व्याजदर, मासिक हफ्त्याची रक्कमेचा तख्ता ही  मिळतो. शिवाय या संकेतस्थळांनी बँकांबरोबर संधान (टाय-अप) केलेले असते. त्यामुळे आपण या संकेतस्थळांच्या मार्फतच कर्जासाठीही ऑनलाइन अर्जही करु शकतो. त्याशिवाय आपण आपल्या मोटारीची माहिती दिली की आपल्या मोटारीला लागणा
र्‍या विम्याच्या हफत्याची रक्कमही कळते.

या संकेतस्थळांवर आपल्याला मोटारींचे बाजारात उपलब्ध असणा
र्‍या विविध सुट्ट्या भागाची यादी व माहिती मिळते. त्याशिवाय या सुट्ट्या भागांची सर्व माहिती उदा: किंमत, कंपनी, इत्यादी ही कळते. शिवाय आपल्याला येथे सुट्ट्या भागांची खरेदी करण्याचे मार्गदर्शनही मिळते. नवीन सुट्ट्या भागांची खरेदी करताना ह्या संकेतस्थळांवर आपल्याला काही प्रश्‍नांची उत्तरे द्याची असतात उदा. आपली खर्च करण्याची तयारी (बजेट), आपल्याला हवी असलेली कंपनी, कंपनीचा ब्रॅंड, इत्यादी. ह्या प्रश्‍नांची उत्तरे भरली की आपल्या समोर एक तख्ताच उघडतो ज्यामध्ये या सुट्ट्या भागांचे फोटो ही असतात. ह्या तख्त्यावरुन आपण कोणते सुट्टे भाग घ्यायचे त्याचा निर्णय घेणे सोपे जाऊ शकते.

या संकेतस्थळांवर आपण आपले खाते उघडले व मोटारींची माहिती सादर केली की या खात्यात आपल्या मोटारींची रखरखावाच्या (सर्विसिंगची) नोंदी करुन ठेवता येतात. त्याचबरोबर आपल्याला या रखरखावा तारीख (सर्विस डेट) यायच्या काही दिवस अगोदरच या संकेतस्थळांकडून इमेल्स व एस.एम.एस. द्वारे त्याबद्दल सूचित केले जाते. त्याशिवाय या संकेतस्थळांद्वारे आपल्याला आपल्या मोटारी संदर्भात इतरही वेळेआधीच सूचना, इमेल्स व एस.एम.एस. द्वारे पाठविल्या जातात उदा: विम्याचा हफ्ता भरण्याची तारीख, व्हील अलाइनमेन्ट व संतुलन करुन घेण्याची तारीख, इत्यादी. 

www.indiadrive.com या संकेतस्थळावर आपण कार-पूल साठीही आपले नाव नोंदवू शकतो. ह्यामुळे आपण रोज ज्या ठिकाणी कामाला जातो व परत घरी येतो त्यावेळेस व त्या मार्गावर अजून कोण प्रवास करतो ते समजते व आपण त्या माणसाबरोबर संर्पक साधून कधी त्याची तर कधी आपली मोटर वापरुन जाऊ शकतो. ह्यामुळे आपला वेळ व पैसा तर वाचतोच शिवाय ट्रैफिक व प्रदूषण रोखण्यासही मदत होते. त्याशिवाय www.indiacar.com या संकेतस्थळावर आपल्याला आर.टी.ओ.च्या विविध कामांसाठी लागणा
र्‍या कागदपत्रांची संपूर्ण यादी व माहिती मिळते.

या संकेतस्थळांवर आपल्याला मोटारींच्या संबंधीची इतर माहिती ही भरपूर मिळते. मोटार विकत घेण्याच्या वेळेस घेण्याच्या काळज्या, सूट मिळविण्याचे व किमतीत घासाघिस करण्याचे सल्ले, इतर लोकांच्या विविध मोटारींबद्दलच्या समिक्षा व मते, ही व अशी माहिती ह्या संकेतस्थळांवर आपल्याला मिळते. शिवाय मोटारीं संबंधी विविध प्रर्दशने, शिबीरे, कार्यशाळा, इत्यादींबद्दल वृत्तांत ही ह्या संकेतस्थळांवर उपलब्ध केले जातात. हल्ली तरुणांना आपल्या संगणकावर मोटारींची विविध चित्रे वॉलपेपर म्हणून ठेवायला आवडतात. अशी विविध चित्रे या संकेतस्थळांवरुन डाऊनलोड करता येतात. बाजारात येणा
र्‍या नवनवीन मोटारींबद्दलचे व्यवसायिकांकडून पूर्वावलोकने (प्रिव्ह्युज), मोटारींबद्दलच्या बातम्या ही ह्या संकेतस्थळांवर वेळोवेळी उपलब्ध केल्या जातात. त्याचबरोबर आपण या संकेतस्थळांवर विविध ऑनलाईन चर्चांही पाहू शकतो व त्यात भागही घेऊ शकतो.

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment