latest Post

भटकंती

I am blogging after a long time. Last few weeks have been really hectic and time has been hard to come by. Anyways...

Today I am publishing a new article on various available travel sites which help travellers in their journeys. Few sites which are considered here are travel guides while few serve as booking sites. 

This article was written by me in the 11th February 2011 issue of Dainik Pratyaksha. 




भटकंती


शाळेच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत. एकदा या परीक्षांची धावपळ व ताण संपला की मग वेळ येते व ओढ लागते ती हवापालटासाठी बाहेरगावी जाण्याची. पूर्वी जास्तीत जास्त मंडळी हवापालट म्हटले की त्यांच्या गावालाच जायचे. पण भारतात नविन नोकर्‍यांच्या संधी आल्या, भारताचा मध्यम वर्ग अधिक सक्षम व सुखवस्तू झाला व फक्त एक दशकापूर्वी सेवा क्षेत्राचा अर्थव्यवस्थेत असणारा फक्त १५% वाटा आज ६०% वर जाऊन पोहोचला आहे. सेवा क्षेत्राच्या वाढीबरोबरच भारतात अनेक हॉटेलस्‌, एयरलाईन्स्‌ आल्या व वाढल्या. त्यामुळे सामान्य माणूस जो अगोदर १२-१३ तास ट्रेन - बसचा प्रवास करुन जायचा तो आता २ तासांच्या फ्लाईटनी जाऊ लागला. आजच्या ह्या लेखात आपण पर्यटन क्षेत्रात मोडणार्‍या सेवा व इंटरनेटच्या माध्यमातून घेता येणारा फायदा ह्यावर संवाद साधणार आहोत.

www.lonelyplanet.comwww.yatra.comwww.cleartrip.comwww.makemytrip.com,
इत्यादी ह्या अशाच काही साईटस्‌ आहेत. सर्वात अगोदर आपण www.lonelyplanet.com बद्दल बघूया. लोनलीप्लॅनेट ही एक पर्यटन मार्गदर्शिका (गाइडस्‌) आहे. ही साईट सर्व जगात कुठेही सफर करण्यासाठीची मार्गदर्शिका आहे. ज्या कोणत्या देशात आपल्याला जायचे आहे व त्याबद्दल जाणून घ्यायचे आहे त्या देशाचे नाव आपल्याला सर्व देशांच्या यादीतून निवडावे लागते. ते निवडले की आपल्याला त्या देशाबद्दल किंवा एखाद्या देशाच्या भागाबद्दलची संपूर्ण माहिती मिळते (उदा: हवामानाचा अंदाज, नकाशे, इतिहास, भेट देता येण्यासारख्या, करमर्णूकीचे व साहसी (ऍडव्हेंचर) खेळांच्या जागा, मुद्रा परिवर्तन (करंसी कन्वर्टर), पासपोर्ट, इत्यादी). सरकारने काढलेले प्रवासी सल्ले (ट्रॅव्हल ऍडवायझरीज्‌) व बातम्या ह्या साईटवर आपल्याला वाचता येतात. या सल्ल्यांमुळे आपल्याला एखाद्या प्रदेशात जाण्याच्या अगोदर व तेथे गेल्यावर घेण्याच्य काळजीबद्दल व्यवस्थित कल्पना येते. त्यामुळे तेथील कोणत्याही राजकीय व सामाजिक परिस्थितीमुळे आपल्यावर कोणताही अघटीत प्रसंग ओढवण्यापासून आपण अगोदरच सावध होऊ शकतो.

या महितीच्या युगात सर्वसाधारण ग्राहक हा अधिक माहिती-संप्पन व सुज्ञ झाला आहे. त्यामुळे हल्ली ग्राहक (प्रवासी) टूर ऑपरेटर्स्‌च्या ऎवजी स्वत:च आपल्या टूर्स्‌ आखतात ज्यामुळे काही प्रमाणात खर्च कमी ही होतो. त्यासाठी आपल्याला लोनली.प्लॅनेटच्या व्यतिरीक्त www.yatra.comwww.cleartrip.comwww.makemytrip.comwww.ixigo.com, इत्यादी साईटस्‌वरुन ही अनेक फिचर्स्‌ मिळतात. आपल्याला ह्या साईटस्‌वरुन एयरलाईन्स्‌, खाजगी (प्रायवेट) बसेस, एस.टी. बसेस, रेल्वे, हॉटेलस्‌ व रेस्टॉरंटस्‌, यात्रा वीमा (ट्रॅव्हल इंन्शूरंन्स्‌) इत्यादींची माहिती मिळते व आरक्षणही करता येते.

आपल्याला ह्या साईटस्‌वरुन एयरलाईन्स्‌ची व आपल्याला हव्या असणार्‍या प्रदेशातील उड्डाणांची संपूर्ण माहिती मिळते (खर्च, उड्डाणाला लागणारा वेळ, वेळापत्रक, इत्यादी). ह्या उड्डाणांची महिती मिळवण्यासाठी आपल्याला फक्त आपल्याला जाण्या-येण्याचे स्थळ, वेळ व आपल्याला हव्या असणार्‍या एयरलाईन ह्याची निवड करावी लागते की आपल्या समोर सर्व पर्यायांचा तख्तातच येतो. शिवाय ह्या साईटस्‌वर उड्डाण स्टेटस ट्रॅकरही (स्थिती सूचक) आहेत. ह्या साईस्‌टवर आपल्या आंतरराष्ट्रीय दौर्‍याच्या वेळेस उतरवावा लागणार्‍या ्विम्याबद्दलची व त्यातील चागंल्या प्रस्तावांची (ऑफर्स्‌) माहिती मिळते. आपण ह्या साईटस्‌वरुन फ्लाईटस्‌चे आरक्षणही करु शकतो. या साईटवर आपण जाणार्‍या प्रदेशातील हॉटेलस्‌बद्दलची व रेस्टॉरंटस्‌ची संपूर्ण माहिती (नावं, पत्ते, तेथील सुविधा, भाव आणि चेक-इन - चेक-आऊट) मिळते व आपण ह्या साईटस्‌वरुन ह्या हॉटेलस्‌चे आरक्षण (बुकिंग) सुद्धा करु शकतो. ह्याच साईटवरुन आपण मनी (पैसे) ट्रान्सफर (हस्तांतरण) एजंटस्‌शीही जोडले जाऊ शकतो. ह्या साईटस्‌वरुन संपूर्ण टूर्स्‌चे आरक्षण करण्यासाठी बाकी आपल्या ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या ऎवजी एक फॉर्म दिलेला असतो ज्यावर आपल्याला आपली संर्पक माहिती द्‍यावी लागते. त्यानंतर ह्या साईटस्‌चे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधून आपल्या टूरची आखणी करतात.www.go4mumbai.com  www.yatra.com या साईटवरुन आपण मेरु टॅंक्सीचे ऑनलाईन आरक्षणही करु शकतो.www.cleartrip.com चे स्वत:चे मोबाईल ऍपलिकेशनही आहे.

बसेस व रेल्वे हे प्रत्येक भारतियाचे पारंपारिक म्हणावे असे प्रवासाचे साधन आहे. एयरलाईन्स्‌ सारखेच आपण बसेसचे आरक्षण ही ह्या साईटस्‌वरुन करु शकतो. www.theluxurybuses.comwww.indiatransit.com,www.onlinebustickets.inwww.makemytrip.com, या साईटस्‌वरुन आपल्याला खाजगी (प्रायवेट) बसेसचे आरक्षण करता येते. त्याशिवाय आपल्याला विविध राज्य सरकारांच्या स्वत:च्या साईटस्‌वरुन उदा: www.msrtc.gov.in,http://ksrtc.in एस.टी बसेसचे आरक्षण ही करता येते. ट्रेस्‌साठी आपण भारतीय रेल्वेच्या स्वत:च्या www.irctc.co.inह्या साईटवरुनही आरक्षण करु शकतो व त्याशिवाय www.yatra.comwww.cleartrip.com,www.makemytrip.com, ह्या सर्व साईटस्‌वरुनही ते करता येते. शिवाय ह्या साईटस्‌वर आपल्याला रेल्वे आरक्षणासाठी लागणारा PNR क्रमांकाचे स्टेटस ट्रॅकरही आहे. ह्या सार्‍या व्यवहारांचा तपशिल (रेकॉर्ड) व त्यामुळेच सुरक्षितता राखण्यासाठी आपल्याला ह्या साईटस्‌वर आपला स्वत:चा अकाऊंट ही बनविता येतो.

ह्या साईटस्‌च्या व्यतिरीक्त सर्व एयरलाईन्स्‌ व प्रमुख खाजगी (प्रायवेट) बसेस, हॉटेलस्‌ व रेस्टॉरंटस्‌च्या हल्ली स्वत:च्या साईटस्‌ असतातच, ज्यावर आपण आरक्षण तर करु शकतोच शिवाय थेट सेवा दात्याकडेच आरक्षण केल्यामुळे काही प्रसंगांमध्ये आपल्याला भावातही चागलीच सूट मिळते.

ह्या साईटस्‌वर आपल्याला पर्यटन मार्गदर्शिका (गाईडस्‌) व प्रवास वर्णने विकतही मिळतात. शिवाय ह्या साईटवर आपल्याला चांगल्या ट्रॅव्हल ब्लॉगस्‌ची माहिती व यादी मिळते ज्यामुळे आपल्यला अगोदर त्या प्रदेशात गेलेल्या पर्यटकांचे अनुभव वाचता येतात. ब्लॉगस्‌चाच विषय निघाला आहे तर एक सांगावासे वाटले कीhttp://ourdelhistruggle.comhttp://www.travelpod.comhttp://backpakker.blogspot.com, हे चांगले ब्लॉगस्‌ आहेत ज्यावर आपल्याला चागले प्रवास वर्णने व अनुभव वाचायला मिळतात. जर आपण ह्या वर उल्लेखिलेल्या साईटस्‌ची सदस्यता घेतली तर आपल्याला पर्यटन क्षेत्राशी निगडीत सर्व अपडेटस्‌ व प्रस्ताव (ऑफर्स्‌) ईमेल किंवा SMS मोफत पाठविले जातात. त्याशिवाय ह्या साईटस्‌वर आपल्यासाठी चर्चा मंच (डिस्कशन फोरम) आहेत ज्यामुळे आपल्याला इतर लोकांचे अनुभव जाणता येतात. ह्या साईटस्‌वर आपल्याला विविध कंपन्या व त्यांच्या सेवांना रेटिंगस्‌ ही देता येतात.

ज्यावेळेस फिरायला जायचे असते त्याच्या काही दिवस अगोदरपासूनच आपण दिवस मोजायला लागतो आणि स्वत:लाच सांगतो की ऑफिसच्या किंवा अभ्यासाच्या ताणापासून काही काळ का होईना पण मोकळे व्हायला आता इतके दिवसच राहिले आहेत. तुम्ही पण नक्कीच मे महिन्याच्या सुट्टीसाठी किती दिवस राहिले ते मोजायला लागलेच असाल. त्यावेळेस बँगस्‌ भरायच्या अगोदर ह्या साईटस्‌चा उपयोग माहितीसाठी किंवा आरक्षणासाठी करायला विसरु नका...

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment