latest Post

‘डी’ फॉर ‘डाऊनलोड’

ध्या इंटरनेटवर मोफत सॉफ्टवेअर्स् म्हणजेच फ्रीवेअर्स् हा विषय अत्यंत लोकप्रिय झाला आहे. ह्या सॉफ्टवेअस्‌चा उपयोग आपल्याला आपल्या रोजच्या व्यवहारांमध्ये भरपूर होऊ शकतो. पण माहिती तंत्रज्ञानातील व्यावसायीक व माहितगारांना सोडले तर ह्या सॉफ्टवेअर्स्‌चा वापर व उपयोगाची तर सोडाच पण त्यांच्या अस्तित्त्वाची माहिती देखील फार कमी लोकांना असते. आपण जनरल-स्टोरस्‌मध्ये गेलो तर आपल्याला किराणा मालापासून बेकरी उत्पादने, पेन, पेन्सिल, नोटबुक, खेळणी, इत्यादी अशा अनेक प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात. समजा असेच जर आपल्याला एकाच साईटवर सर्वात उपयुक्त व लोकप्रिय सॉफ्टवेअर्स् एकाच ठिकाणी मिळाली तर त्यांचा उपयोग समजून ती वापरायला फार सोपे जाईल. www.freenew.net ही अशीच एक साईट आहे. अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले तर ही साईट म्हणजे फ्रीवेअर सॉफ्टवेअर्स्चे जनरल स्टोअर्स् आहे.

या साईटवरुन आपल्याला काय डाऊनलोड करता येते?
या साईटवरुन आपण विविध सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स्‌चे सेटअप्स् डाऊनलोड करु शकतो. विविध ब्राऊझरस्, संपर्क साधण्याची सॉफ्टवेअरस् उदा: चॅट सॉफ्टवेअर्स्, ऍन्टी-वायरस व फायरवॉल, ऍन्टी-स्पायवेअर, ऑपरेटिंग सिस्टीमसाठी उपयोगाची ऍप्लिकेशन्स्, विविध ऑफिस ऍप्लिकेशन्स्, ऑडीयो-व्हिडीओ प्लेअर्स्, फोटो-एडिटींग व फोटो-मॅनेजर ऍप्लिकेशन्स्, सी.डी. व डी.व्ही.डी एडिटींग सॉफ्टवेअर्स्, फाईल शेअरिंग व ट्रांस्फर ऍप्लिकेशन्स्, कॉंप्रेशन व बॅकअप ऍप्लिकेशन्स्, सॉफ्टवेअर ड्रायवर्स्, व्यवसायास उपयुक्त ठरणारी सॉफ्टवेअर्स्, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टूल्स. इत्यादी आपल्याला या साईटवरुन मोफत डाऊनलोड करता येतात. त्याशिवाय आपल्याला मोबाईलची ऍप्लिकेशन्स् सुद्धा मोफत डाऊनलोड करता येतात.        
ऍप्लिकेशन्स्
उपयोग
ब्राऊझर्स्
मोझीला फायरफॉक्स, गुगल क्रोम, ओपेरा व सफारी, इ.
असे ऍप्लिकेशन्स जे वापरुन आपण इंटरनेटचा वापर (ऍक्सेस) करु शकतो.
चॅट
स्काईप, याहू मेसेंजर, कॅमफ्रॉग व्हिडीओ चॅट, गूगल टॉक, इ.
या चॅट ऍप्लिकेशन्स्‌चा उपयोग करुन आपल्या संपर्क सूचीतील संपर्कांशी ऑनलाईन संवाद साधू शकतो.
ऍन्टी-वायरस, फायरवॉल आणि ऍन्टी-स्पायवेअर
ए.व्ही.जी., एव्हास्ट व एव्हीरा इ.
ही संगणकाच्या सुरक्षेशी निगडीत ऍप्लिकेशन्स् आहेत. ऍन्टी-वायरस हे वायरसला आपल्या संगणकाला बाधा करण्यापासून रोखते, त्यात शिरलेले वायरस हुडकते व त्यास मारते. फायरवॉल हे वायरस व इतर दुरुपयोगी प्रोग्रॅम्स आपल्या संगणकावर हल्ला करण्यापासून थांबवते.
ऑपरेटींग सिस्टीमला उपयुक्त अशी  सॉफ्टवेअर्स् (सिस्टीम युटिलिटीझ)
- ऍडव्हान्स्ड सिस्टीमकेअर
- स्मार्ट डिफ्रॅग
- सी-क्लिनर, रेवो अनइन्स्टॉलर, इ.

ह्यांच्या उपयोगाने आपल्या ऑपरेटींग सिस्टीमची कार्यक्षमता वाढते.
- हे आपल्या ऑपरेटींग सिस्टीम मधील धोकादायक भासणार्‍या प्रोग्रॅम्स्चे काम करणे गोठवते.
- हे वापरुन आपल्याला आपल्या संगणकावरील डेटा डिफ्रॅग्मेंट करता येतो म्हणजेच तो आपल्याला ऍक्सेस जास्त लवकर करण्यास मदत होते.
- ह्यांच्या उपयोगाने आपण आपल्या संगणकामधील टेंपररी (निरुपयोगी) फाईल्स् डिलीट करु शकतो.
ऑफिस ऍप्लीकेशन्स् -
ओपन-ऑफिस, ऍडोब रीडर,
क्युट पी.डी.एफ रायटर व
फॉक्सइट रीडर, इ.
ह्यांचा उपयोग आपल्याला विविध प्रकारचे दस्तावेज (डॉक्युमेंटस्) बनविण्यासाठी होतो.
ओपन-ऑफिस हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखेच ऑफिस-ऍप्लिकेशन आहे, ज्याच्या उपयोगाने आपण वर्ड, एक्सेल, पावर-पॉईंट, इत्यादी डॉक्यूमेंट्स् बनवू शकतो. ऍडोब रीडर, क्युट पी.डी.एफ. रायटर व फॉक्सइट रीडर ही सर्व पी.डी.एफ दस्तावेजांशी संबंधित ऍप्लिकेशन्स् आहेत.
ऑडीओ-व्हिडीओ -
व्ही.एल.सी. मीडिया प्लेअर, रीअल प्लेअर, ऍप्पल आय-ट्युन्स् व हुलु डेस्कटॉप, इ.
ही ऑडीओ (गाणी) व व्हिडीओ (चलचित्र) पाहण्याची साधनं आहेत.

फोटो-एडिटींग व फोटो-मॅनेजर -
पेंट.नेट, जी.आय.एम.पी., पिकासा, इरफानव्ह्यू , इ.
ह्या एडिटींग सॉफ्टवेअस्‌चा वापर करुन आपण आपल्या फोटोंमध्ये आपल्याला हवे असलेले  बदल करुन ते अधिक सुशोभित करु शकतो.
सी.डी. व डी.व्ही.डी एडिटींग -
सीडीबरनरएक्सपी, डेमन टूल्स लाईट, एओए डीवीडी रिप्पर व इमेजबर्न  इ.
यांचा उपयोग करुन आपल्याला नविन सी.डी. आणि डी.व्ही.डी बनवता येते.

फाईल शेअरिंग व ट्रांसफर -
यूटोरेंट, फ्रॉस्टवायर, टीमव्यूअर, बिटकॉमेट, इ.
यांच्या उपयोगाने आपण एकाच वेळेस एकास किंवा एकाच वेळेस अनेकांशी आपला डेटा शेअर करु शकतो.
कॉंप्रेशन व बॅकअप -
वीन-रार, वीन-झीप, ड्रॉपबॉक्स
व पीझीप, इ.
यांच्या उपयोगाने आपण आपल्या डेटाचा आकार भरपूर कमी करु शकतो. डेटाचा आकार कमी झाल्याने आपली संगणकाची क्षमता तर वाचतेच शिवाय जर आपल्याला हा डेटा इंटरनेटच्या माध्यमाने इमेल किंवा अपलोड करायचा असेल तर ते सोपे व किफायतशीर पडते.
सॉफ्टवेअर ड्रायवर्स्  -
फ्लॅश व मायक्रोसॉफ्टच्या प्रोग्रॅम्स्‌शी संबंधित बरेच ड्रायवर्स् आपल्याला या साईटवरुन डाऊनलोड करता येतात.
हे सॉफ्टवेअर व त्या संबंधित हार्डवेअर यांमधील संपर्क यंत्रणेचे काम कारणारे प्रोग्रॅम्स् असतात.

जर कुठल्या दुकानात, एकाच ठिकाणी सर्व काही मिळत असेल तर त्याला फ्रॉम पीन टू पियानो असे म्हटले जाते. ही साईट सुद्धा फ्रीवेअरच्या बाबतीत तशीच फ्रॉम पीन टू पियानो चे काम करते. आपल्याला लागणारी सर्व प्रमुख फ्रीवेअर्स् ह्या साईटवर मोफत मिळतात. या लेख मालिकेत आपण पुढे नक्कीच यातील काही सॉफ्टवेअरर्स्‌बद्दल इत्थंभूत जाणून घेऊच. पण सर्व सामान्य संगणक उपभोक्त्यांनी ही गोष्ट नक्कीच आपल्यामध्ये उतरवावी की सॉफ्टवेअर्स् वापर हा फक्त काही माहिती तंत्रज्ञानातील व्यावसायिक व माहितगारांना मिळालेला मक्ता नाही. त्यामुळे त्यांच्या उपयोगाने आपला वेळ व श्रम वाचविणे ही नक्कीच सयुक्तिक ठरेल.

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

1 comments: