I am publishing the 7th article from the my series on Freewares in Dainik Pratyaksha. The article is on www.ngpay.com which is a mobile based shopping platform. This article had featured in the issue of Pratyaksha dated 31st December 2010.
मोबाईलमधील मॉल - 'एक हात का खेल'
खरेदी म्हणलं की ’शॉपिंग मॉल’मध्ये जाणं हेच मानलं जातं कारण येथे सर्व गोष्टी एकाचजागी
मिळतात. आज मॉलमध्ये जाण्याची गरज ही हळू-हळू कमी होत चालली आहे कारण आता घर बसल्या
अन्न पदार्थ, किराणा, कपडे, दागिने, इत्यादी आणून दिले जाते. ह्यालाच आपण ’फ्री होम डिलिव्हरी’ असे म्हणतो. त्याच्याही पुढे जाऊन मग आपण संगणकावरुन खरेदी करायला लागलो,
ज्याला आपण ऑनलाईन शॉपिंग म्हणून ओळखतो. पण आता तर त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला
मोबाईलवरुन देखील मॉलसारखेच सर्व काही एका जागीच खरेदी करु शकतो. त्याचा एक नमुना
म्हणजे www.ngpay.com हे संकेतस्थळ. ह्या संकेतस्थळाचा वापर
मुख्य म्हणजे हे संपूर्णपणे मोफत आहे.
हे संकेतस्थळ ’जीग्राहक मोबिलिटी सोल्युशन्स प्राइवेट लिमिटेड’ या बंगळूर स्थित एका
भारतीय कंपनीचे आहे. हेलिओन वेंचर पार्टनर्स एल.एल.सी. ह्या मॉरिशस स्थित कंपनीची ह्यात आर्थिक
गुंतवणूक आहे. हे संकेतस्थळ फेब्रुवारी २००८ मध्ये सुरू करण्यात आले. फेब्रुवारी २००८
पासून आजपर्यंत (३१ डिसेंबर २०१०) कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे ह्याचे ५ लाखहून अधिक सभासद झाले आहेत. एनजीपेला आत्तापर्यंत
नॅसकॉमचे भारतातील ’टॉप १०० आय.टी. इनोव्हेटरस्’, जागतिक आर्थिक मंचाचे ’३४ ग्लोबल टेक्नोलॉजी पायोनीयरस् फॉर २००९’ हे व असे एकूण ७ पुरस्कार मिळाले आहेत.
येथे आपण (भारतात) खरेदी करु शकतो, मित्रांना व नातेवाईकांसाठी उपहार पाठवू शकतो, सिनेमाची
तिकिटे खरेदी करु शकतो, प्रवासाचे आरक्षण करु शकतो. मोबाईल व डी.टी.एचचे े रीचार्ज करु शकतो,
आपली अनेक प्रकारची (उदा. वीज, फोन, गॅस, इत्यादीची) बिले भरु शकतो, बँकेचे व्यवहार
देखिल करु शकतो व आणखीन बरेच काही करता येते या एनजीपेवरुन व ते ही फक्त आपल्या हातातील मोबाईलवरुनच.
एनजीपे वापरण्यास काय लागते?
एनजीपे हे कुठल्याही जावा असणार्या (एनेबल्ड) मोबाईलवर चालते (ज्याची किंमत रु. २०००/-च्या वर असते.)
शिवाय आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट असणे गरजेचे असते. एनजीपे कोणत्या मोबाईलवर
चालू शकते त्या मोबाईलस् ची यादी एनजीपेच्या संकेतस्थळावर
दिली आहे. हल्ली इंटरनेटच्या अनेक स्वस्त योजना बाजारात उपलब्ध आहेत. जरी एनजीपे हे मूलतः कोणत्याही
व्यवहारावर पैसे आकारत नसले तरी काही सेवांवर एनजीपे पैसे आकारू शकते.
पण जर असे पैसे आकारले जात असतील तर तसे आपल्याला, आपण पैसे भरून व्यवहार करायच्या
अगोदरच सूचित केले जाते.
एनजीपे वापरायचे कसे?
आपण एनजीपेवर गेलो की पुढील www.ngpay.com/site/howitworks.html या
जागी जायचे व आपला मोबाईल क्रमांक तेथे सादर करायचा असतो किंवा ५६७६७ या
क्रमांवर ’एनजीपे’ हा मसूदा एम.एस.एम. करायचा असतो. त्यानंतर एनजी आपल्याला एक एम.एस.एम. पाठवते ज्यामध्ये एक लिंक दिलेली आसते ज्यावरुन आपण एक ऑपलिकेशन डाउनलोड व इंस्टॉल करायचे असते (डाउनलोड व इंस्टॉल करण्याची सर्व माहिती संकेतस्थळी
उपलब्ध केलेली आहे). त्यानंतर आपल्याला एनजीपेवर स्वतःची नोंदणी
करायची असते, ज्यामध्ये आपले नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, इमेल, इत्यादी माहिती सादर
करायची असतो. ज्या वेळेस आपण एनजीपेचे सभासद होतो त्यावेळेस
आपणच ६ आकडी पिनक्रमांक घ्यायचा असतो. हा पिनक्रमांक आपल्याला दर वेळी ज्यावेळेस
आपण कोणता व्यवहार एनजीपे वापरून करू त्यावेळेस सादर करावा
लागतो. त्यानंतर आपण आपल्याला हव्या असणार्या कंपन्या (उत्पादने किंवा सेवा) ज्या
आपण आपल्या मोबाईलवरुन वापरणार आहोत त्या निवडू शकतो उदा: किंगफिशर एयरलाईन्स, एच.डी.एफ.सी. बँक, आय.आर.सी.टी.सी. (रेल्वे आरक्षण), फन सिनेमा, आरचिज् ग्रीटिंगस्, महानगर गॅस, रिलायन्सएनर्जी, महावितरण (महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी), एम.टी.एन.एल., टाटा इंडिकॉम, लूप मोबाईल,
इत्यादी. अशा १०० हून अधिक कंपन्यांबरोबर एनजीपेचे संधान (टाय-अप) आहे. या यादीत ज्यावेळेस नविन कंपन्यांची जोडणी होते त्यावेळेस ती लगेचच सभासदांच्या
मोबाईल वर उपलब्ध केली जाते.
एनजीपेवर आर्थिक व्यवहार कसे होतात व ते कितपत सुरक्षित आहेत?
एनजीपे वापरणार्यांच्या मते, एनजीपे आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत सुरक्षित आहे. एनजीपेकडे १२८ बिट्सची फायनॅनशियल ग्रेड सीक्युरिटीचे प्रमाणपत्र ही आहे. ह्य व्यवहारांमधली सुरक्षितता
ही ए.टी.एम. व्यवहारांच्या एव्हडीच सुरक्षित मानली जाते. सभासद म्हणून आपण देयकाची
(पेमेंटची अनेक साधने वापरू शकतो उदा: मास्टरकार्ड / वीझा क्रेडिटकार्ड, एच.डी.एफ.सी. बँक
खाते आणि इटझ्कॅश लवकरच सभासद त्यांची इतर बँकांची खाती, कॅश कार्ड व डेबिट कार्ड
वापरू शकतील. तसेही एनजीपे स्वतः कोणत्याही आर्थिक व्यवहार
करतच नाही. सर्व आर्थिक व्यवहार हे संधान बांधलेल्या कंपन्यांकडूनच होतात. शिवाय सभासद
त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा इतिहास ही राखून ठेऊ शकतात (एनजीपे वॉलेटमध्ये) जेणे
करुन कोणी दुसरीच व्यक्ति आपल्या नावावर व्यवहार करत नाही ना हे तपासण्यास मदत होते.
शिवाय ज्या वेळेस आपण कोणताही व्यवहार एनजीपेद्वारे करतो त्यावेळेस
त्या व्यवहाराचा पूर्ण तपशील आपल्याला एम.एस.एम. व इमेलद्वारे पाठवला जातो.
एनजीपे आपल्या मोबाईलमध्ये
एक मोबाईल वॉलेट तयार करते जे तोडणे कठीण असते. हे मोबाईल वॉलेट आपली सर्व बँक खाते
व क्रेडिट कार्डसची माहिती ही एन्क्रिप्ट करुन साठवते. शिवाय जरी आपल्या
बँक खाते व क्रेडिट कार्डची माहिती आपल्या मोबाईल मधिल मोबाईल वॉलेटमध्ये असली
तरी वर उल्लेखिलेल्या पिनक्रमांक हा काही मोबाईलमध्ये नसतो. त्यामुळे जरी आपला मोबाईल
हरवला तरी, कोणतीही इतर व्यक्ति ह्या पिनक्रमांकाशिवाय आपल्या व्यवहाराचा तपशील बघू
शकत नाही किंवा कोणतीही गोष्ट आपल्या पैश्यांनी विकतही घेऊ शकत नाही. आपण एनजीपेच्या ग्राहक संबंध
विभागास (जो दिवसाच्या २४ तास चालू असतो) फोन करुन, आपला पिनक्रमांक सांगून एनजीपे आपल्या त्या हरवलेल्या
मोबाईलवर गोठवू शकतो. आपण दिलेली आपली वैयक्तिक माहिती ही एनजीपेच्या म्हणण्याप्रमाणे
कोणत्याही माणसास अथवा कंपनीस पूरविली जात नाही.
समजा जर आपला व्यवहार चालू असताना आपला मोबाईल बंद झाला किंवा आपला इंटरनेटचा संपर्क
तुटला तरी आपल्या क्रेडिटकार्ड मधील पैसे वजा तोवर केले जात नाहीत जोवर आपला
व्यवहार यशस्विरित्या पार पडत नाही.
माणसाच्या गरजा वाढल्या आहेत. त्या गरजा पूर्ण करायला आज त्याच्याकडे अनेक साधनेही आहेत व ती साधने कमवण्यासाठी अनेक संधी ही उपलब्ध आहेत. पण ह्या शर्यतीमुळे आज सर्वात महत्त्वाचे व दुर्गम असे काही झाले असेल तर तो आहे वेळ. हा वेळ वाचवण्यासाठी व मिळवण्यासाठी आपण वेळेचे उचित नियोजन व व्यवस्थापन करणे हे तर गरजेचेच आहे पण त्याचबरोबर काळाबरोबर बदलत जाणार्या, अधिक प्रगल्भ व त्यामुळे आपली कामे अधिक सोपी करणार्या तंत्रज्ञानाचा वापर करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे व एनजीपे हे त्याचेच उदाहरण आहे.
Hari om,
ReplyDeleteThanks for great information.
now a day cyber attacks are increases everywhere. and online banking, netbanking. online purchase not that much done due to security problem.
This is most secured site.
thanks for nice information
Ambadnya
Makarand Mandlik