Today I am publishing the 6th article of my series on m-Indicator. Bapu has always believed in the principal of safeguarding and promoting Common Interest of Common Man. This applications which we would be seeing today totally adheres to this principal. This article had appeared in the issue of 24th December 2010 in Dainik Pratyaksha.
Also my sincere apologies to all the readers as I couldn't publish the article in this series on last Saturday.
डिजीटल वाटाड्या
समजा तुम्ही बोरिवलीला रहात असाल व नोकरी
करता दादरला जात असाल, पण एके दिवशी अचानक तुम्हाला ऑफिसच्या कामानिमित्त दादरहून
घाटकोपरला जायचे आहे व तिथूनच नंतर तुम्ही घरी बोरिवलीला जाणार आहात. पण समजा हा रस्ता
तुमचा माहितीतला नासेल तर तुमच्या समोर दोन प्रश्न नक्कीच असतील, की दादरहून घाटकोपरला
व मग घाटकोपरहून बोरिवलीला कोणती बस जाते किंवा लोकलचं वेळापत्रक काय. विशेषत: ज्या मार्गांवर गाड्या तुरळक आहेत तेथे ही बाब महत्त्वाची ठरते उदा: वाशी-ठाणे रेल्वे मार्ग (विस्तारीत मध्य रेल्वे).
या सार्या तुमच्या समस्यांवर तुम्हाला एक वाटाड्या नक्की मदत करु शकतो. या वाटाड्याचे नाव आहे m-indicator (एम-इंडिकेटर). हा एक मोबाईल आधारित (बेस्ड) सॉफ्टवेअर
प्रोग्रॅम आहे.
www.mobond.org ह्या संकेतस्थळावरुन
आपण एम-इंडिकेटर हे सॉफ्टवेअर डाउनलोड करु शकतो. सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की या
सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला कोण-कोणत्या कार्यात्मक सुविधा (फिचर्स) मिळू शकतात.
१) अगोदर
म्हटल्या प्रमाणे आपल्याला एम-इंडिकेटरमध्ये बेस्ट बसेस् चा मार्ग शोधता येतो (रुट
फाइंडर).
३) भारतातील कोणत्याही रेल्वे प्रवासाची आरक्षण स्थिती (PNR स्टेटस),
४)
मुंबईच्या ऑटोरिक्शा व टॅंक्सीची भाडेवारी
५) रेल्वेद्वारे दर रविवारी घोशीत होणार्या
मेगाब्लॉकची माहिती, या सार्या कार्यात्मक सुविधा आपल्याला या एम-इंडिकेटर सॉफ्टवेअरमधून मिळू शकतात व सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड करता येते
व हे वापरण्यासाठी आपल्याला भ्रमणध्वनि संचामध्ये (मोबाईल) जीपीआरएसची गरज नाही.
इन्स्टॉलेशन पध्दती
हे सॉफ्टवेअर पुढे उलेखिलेल्या मोबाईलस्
आणि त्यातील एक्सटेंशनस्मध्येच चालते.
१) नोकिया, सोनी, सॅमसंग व एल.जी. चे मोबाईलस्:
.jar आणि .jad
२) ब्लॅकबेरी: .cod आणि .alx
३) ऍडरॉइड: .apk आणि andme_signed.apk
(दोन्ही apk डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
आपल्या मोबाईलमध्ये एम-इंडिकेटर इन्स्टॉलेशन
करण्यासाठी आपलाल्या फोनमध्ये जावा सपोर्ट (CLDC 1.0 किंवा त्याच्या वरचे व्हर्जन,
MIDP 2.0 किंवा त्याच्या वरचे व्हर्जन सहित) असणे अनिवार्य आहे. इन्स्टॉलेशन करताना
आपल्या मोबाईलमध्ये .jar आणि .jad फाईल्स कॉपी करुन घ्याव्यात. त्यानंतर .jad फाईल
वर क्लिक करावे. व जर आपल्या मोबाईलवर जीपीआरएसची सोय असेल तर आपण थेट
http://mobondweb.mobond.org/install.jsp या लिंकमधून डाऊनलोड करु शकता किंवा आपल्या
संगणकामध्येही डाऊनलोड करुननंतर आपल्या मोबाईलमध्ये ब्लू-टूथ किंवा USB वायरच्या
मदतीने स्थानांतरित (ट्रान्स्फर) करु शकता.
एम-इंडिकेटर चे फिचर्स
१) एम-इंडिकेटर वर आपल्याला बेस्ट बसेस्चा मार्ग शोधता येतो. समजा आपल्याला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जायचे आहे. ह्या
दोन ठिकाणांची नावे एम-इंडिकेटर वर उपलब्ध असलेल्या यादीतून निवडावी लागतात. त्यानंतर
आपल्याला या मार्गावर धावणार्या बस गाड्यांची यादी आपल्या मोबाईलच्या स्क्रिन वर दिसते.
बेस्टच्या स्वत:च्या साईट्वर (www.bestundertaking.com) सुध्दा आपल्याला हे
फिचर मिळतं. तसेच जर आपण कोणत्याही बसचा क्रमांक टाकला तर आपल्याला त्या बसचा मार्ग
व त्याच्या थांब्यांबद्दलची पूर्ण माहिती मिळते. त्याच बरोबर त्या बसच्या दोन थांब्यांमधील
तिकीटाच्या भाड्यांच्या किंमतीही कळतात.
२) एम-इंडिकेटर वर आपल्याला पश्चिम,
हार्बर, मध्य, हार्बर व विस्तारीत-मध्य रेल्वेची समय-सारिणी (टाइम-टेबल) मिळते.
यामुळे आपण आपल्याला आपल्या वेळेनुसार योग्य त्या ट्रेनची माहिती मिळून त्यानुसार
आपला कार्यक्रम आखता येतो. अगोदर म्हटल्या प्रमाणे, खास करुन अशा मार्गांवर ज्यावर
गाड्या तुरळक आहेत, उदा: वाशी-ठाणे रेल्वे मार्ग (विस्तारीत-मध्य रेल्वे) तेथे या फिचरचा
उपयोग होतो. त्याच बरोबर, प्रत्येक ट्रेन कोणत्या स्थानकावर थांबणार आहे व कोणता मार्ग
अवलंबिणार आहे ते समजण्यास मदत होते.
३) एम-इंडिकेटर वर आपल्याला भारतातील
कोणत्याही रेल्वे प्रवासाच्या तिकिटाची आरक्षण स्थिति (PNR स्टेटस) बद्दलची माहिती
सुद्धा मिळते. आरक्षणासाठी आपल्याला रेल्वे कडून मिळालेला १० आकडी PNR क्रमांक आपण एम-इंडिकेटरमध्ये टाकला की त्यानंतर आपल्याला गूगलकडून एका SMS द्वारे आपल्या
PNR क्रमांकाची आरक्षण स्थिति कळते. (युझरला गूगल कडून SMS मिळण्यासाठी
m-indicator हे इंटरफ़ेसचे काम करते).
४) एम-इंडिकेटर वर आपल्याला मुंबईच्या
ऑटोरिक्शा व टॅंक्सीची भाडेवारी मिळते (दिवसाची व रात्रीची). काही वेळा रिक्शा व टॅंक्सी
चालकांकडून प्रवाश्यांना भाड्यामध्ये फसविण्याचे किस्से आपल्या कानांवर पडतात. ही
फसवणूक थांबविण्यासाठी आपण जर मिटरवर दिसणारा भाड्याचा आकडा एम-इंडिकेटरमध्ये टाकला
तर त्या आकड्याशी निगडीत खरे भाडे आपल्याला कळते.
५) एम-इंडिकेटर वर आपल्याला रेल्वेच्या
रविवारच्या मेगाब्लॉकची माहिती मिळते. त्याशिवाय जर आपण एम-इंडिकेटरला SMS पाठवून
त्याची सदस्यता स्विकारली (ही सदस्यता मोफत मिळते) तर त्यांच्याकडून आपल्याला मेगा-ब्लॉकची
माहिती देणारे नियमित SMS गूगलकडून येतात.
एम-इंडिकेटरसारखे ’आमची मुंबई’ नावाचे
ही एक हुबेहुब सॉफ्टवेअर आहे. त्याशिवाय www.go4mumbai.com नावाची ही एक वेबसाईट आहे ज्यावर एम-इंडिकेटरची सर्व फिचर्स (PNR स्टेटस सोडून)
मिळतात. शिवाय ह्या वेबसाईटवर आपल्याला मेरु टॅंक्सी ही ऑनलाईन बुक करता येते.
महिती-तंत्रज्ञाना मुळे हे जग जवळ येत
आहे असे म्हणतात. पण म्हणून आपल्याला प्रवास काही चुकलेला नाही. महिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करुन हा प्रवास आपण नक्कीच सुकर करु शकतो. तुम्ही
कितीही अनोळखी ठिकाणाहून येऊन मुंबईत प्रवास करित असाल किंवा तुम्हाला मुंबईतील विशिष्ट
भागाची काहीही माहिती किंवा कल्पना नसेल तर हे एम-इंडिकेटर तुमचा अगदी जिवलग मित्र
बनून ’वाटाड्याच’ काम उत्कृष्ट प्रकारे करतो व योग्य ठिकाणी तुम्हाला नेऊन सोडतो.
0 comments:
Post a Comment