latest Post

सरकारी नोकरीचा खजीना

Hello Friends, 

We are meeting after a long time. I couldn't write much as was busy with few important tasks. Today I am publishing the 9th article of my series on 'Freewares for Common Man' in Pratyaksha. This article will help you to search and prepare for jobs and related exams for entry into various departments of Government of India as well as various state governments, public sector undertakings (PSU) which also includes nationalized banks and local governing bodies. 

This article was published on 14th January 2011. An article not to be missed missed by those who are willing to join forces or any other government department. 

We are already being made aware by Sadguru Bapu through his discourses and writings about the hardships that the world would be facing in the times to come. Against this backdrop this article holds utmost importance. 



सरकारी नोकरीच्या शोधात असलेला जवळपास प्रत्येक भारतीयच सुरक्षित आणि शाश्‍वत नोकरी (जॉब सिक्यूरिटी असलेली) मिळविण्यासाठी सर्वात जास्त प्राधान्य देतो. सध्या आय.टी., आय.टी.ई.स. व इतर नवीन उद्योग क्षेत्रातील नोकर्‍यांची चलती आहे. तरी नुकताच तडाखा देऊन गेलेल्या जागतिक आर्थिक मंदीची झळ या क्षेत्रांना व त्यातील नोकरदारांना चांगलीच जाणवली होती. दरम्यान जॉब सिक्यूरिटीचा उल्लेख केलाच तर कोणाच्याही नजरेसमोर एक पर्याय हमखास येतो व तो म्हणजे सरकारी किंवा बँकांच्या नोकरीचा. सहावा वेतन आयोग लागू झाल्यापासून तर या क्षेत्रातील सर्व पदांचे पगार जवळ-जवळ खाजगी क्षेत्राच्या बरोबरीला आले आहेत. त्याशिवाय ह्या सरकारी नोकर्‍या, त्यांच्यात मिळणारा आदर आणि सोई-सुविधांसाठी ही नावाजल्या जातात. प्रत्येक लहान मुलाचे वायु-सेनेत पायलट, भूदलात किंवा नौदलातील अधिकारी किंवा आयएएस-आयपीएस अधिकारी होणे हे स्वप्‍न असतेच. या क्षेत्रांमध्ये नोकर्‍यांची माहिती मिळविण्यासाठी आत्तापर्यंत फक्त वर्तमानपत्रात आलेली विज्ञापने वाचणे किंवा सरकारी रोजगार कार्यालयाच्या (एप्लॉयमेंट एक्सचेंज) सूचनेवर अवलंबून रहाणे एवढेच पर्याय उपलब्ध होते. पण आता इंटरनेट व त्या वरील वेबसाईटस् हा ही एक पर्याय उपलब्ध झाला आहे. ह्याच पर्यायांबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्‍न आपण या लेखातूनं करणार आहोत.

www.upscportal.comwww.gjtutorial.com या वेबसाइटस् आपल्याला ’मोफत’ वापरायला मिळतात. या साईटस् भारतीय लोक सेवा आयोग (UPSC म्हणजेच Union Public Service Commission च्या परीक्षा, उदा: CDS [Combined Defence Services), CSE (Civil Services Examination), IFS (Indian Forest Services), NDA / NA (National Defence Academy / Naval Academy), या व अशा ३३ सरकारी परीक्षा] व सर्व बँकांच्या व सरकारी संस्था व आस्थापनांच्या प्रवेश परीक्षांच्या परिक्षार्थींना भरपूर उपयुक्त ठरु शकतात.

साधारणत: सरकारी संस्था व आस्थापनांच्या परीक्षा ह्या कठीण मानल्या जातात. त्याच बरोबर सरावासाठी त्यांच्या मागील वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका मिळणे ही कठीण असते. हा पेच सोडविण्यासाठी ह्या सर्व परीक्षांच्या प्रत्येक विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांचे नमुने त्याचबरोबर मागील वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका आणि त्यांच्या उत्तरपत्रिका ही या साईटस् वर उपलब्ध आहेत ज्या आपण डाऊनलोड करु शकतो. यामुळे या परीक्षांचा आपल्याला सराव होण्यास ह्या साईटस् चा भरपूर उपयोग होऊ शकतो.

जीजेट्युटोरियल व युपीएससीपोर्टल वर आपल्याला ह्या सर्व या परीक्षांचे अर्ज (ऍपलिकेशन फॉर्मस्) व विषयाचा अधिकृत अभ्यासक्रम ही मिळवता येतो. त्यामुळॆ विद्यार्थ्यांचा काही वेळेस होणारा अभ्यासक्रमाबद्दलचा गोंधळ कमी होण्यास नक्किच मदत होते. त्याच बरोबर आपल्याला या साईटस् वर सर्व सरकारी परीक्षांचे निकाल ही लगेचच कळतात.

युपीएससीपोर्टलवर जगातील व खासकरुन भारतातील सर्वच घडामोडींवर उत्कृष्ट लेख व माहिती असते. या मासिकांच्या आधारे सामान्य ज्ञान वाढविण्यास भरपूर वाव आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे upscportal.com वर NCERT अभ्यासक्रमाच्या नोट्स ही उपलब्ध आहेत. या नोट्स मोफत उपलब्ध असल्या कारणांनी परीक्षार्थींचा महागड्या पुस्तकांवर होणारा खर्च बर्‍याच प्रमाणात वाचू शकतो. upscportal.com वर आपण सामान्य ज्ञानाच्या व वर्तमान घडामोडींच्या प्रश्न्मंजुषा (क्विझ) सोडवू शकतो. सर्वात मुख्य म्हणजे प्रत्येक परीक्षेच्या अभ्यासक्रमानुरुप या प्रश्न्मंजुषा असतात. upscportal.com वर परीक्षांसाठी मार्गदर्शन पुस्तिका ही उपलब्ध आहेत. या मार्गदर्शन पुस्तिकांच्या व्यतिरिक्त upscportal.com वर सारखे व साधारणत: सर्व परीक्षार्थिंकडून विचारले जाणार्‍या प्रश्नांचा (FAQs) संचही आहे. upscportal.com वर महत्त्वाच्या प्रश्नांचा संचयही आहे. या प्रश्नांमुळे प्राधान्य कोणत्या प्रकारच्या व कोणत्या विशिष्ट प्रश्नांना द्यायायचे ते ठरवण्यास सोपे जाते. gjtutorial.com वर आपल्याला ह्या सर्व परीक्षांच्या संपूर्ण नोट्स रु.७५०/- ते रु.१२००/- पर्यंत मिळतात. upscportal.com व gjtutorial.com वर आपले नाव व ईमेल आय.डी. दिला की आपल्याला त्यांच्या कडून नियमित मोफत समाचारपत्र (न्यूजलेटरस्) पाठवले जाते ज्यामध्ये परीक्षांच्या आगाऊ सूचना, परीक्षांशी संबंधित बातम्या, जगात व भारतातील घडामोडींची माहिती, परीक्षांच्या नोट्स, इत्यादी माहितीचा समावेश असतो.

त्याशिवाय परीक्षांच्या गुणवत्ता यादीत येणार्‍या विद्यार्थ्यांच्या मुलाखतींचे विडियोज् ही upscportal.com आपल्यासाठी उपलब्ध आहेत. ह्या मुलाखतींमुळे आपल्याला ह्या विजेत्यांच्या अनुभवाच्या बोलांचा भरपूर फायदा होऊ शकतो. त्यांच्या अनुभवातून आपण उचित गोष्टी घेऊन त्या अमलात आणू शकतो. upscportal.com वरील इतर नेटकरांबरोबर आपण विचार-विनिमय (फोरम डिस्कशन) करु शकतो. या विचार-विनिमयांमुळे आपल्याला ज्ञानाच्या व अनुभवांच्या आदान-प्रदानात भरपूर मदत होते.

या दोन साईटसच्या व्यतीरिक्त www.employmentnews.gov.in हे भारत सरकारचं स्वत:चे संकेतस्थळ आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजच्या या साईटच्या व्यतिरिक्त स्वत: चे साप्ताहिक वर्तमानपत्र ही प्रकाशित होते ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सरकारी नोकर्‍यांचे अर्ज व विज्ञापने असतात. ही साईट हिंदी भाषेत ही उपलब्ध आहे त्यामुळे साधारणत: प्रत्येक भारतीयाला ही साईट वाचता .येण्याची सोय आहे. त्याशिवाय www.allgovtnaukri.com ही साईट व http://sarkari-naukri.blogspot.com हा ब्लॉग ही उपयुक्त आहेत.

पुढे येणारा काळ हा नक्कीच कठीण व अनिश्चिततेने भरलेला आहे. या काळात आपल्या स्वत:चे, कुटुंबाचे, समाजाचे व राष्ट्राचे हीत राखणे व जपणे ही सर्वांची प्रथम जवाबदारी व प्राथमिकता असेल. त्यासाठी सरकारी नोकरी हा अनेक उपलब्ध पर्यायातील एक उत्तम पर्याय आहे व ह्या पर्यायांची संपूर्ण व जशीच्या-तशी माहिती मिळवून त्याच्या अनुषंघाने आपली तयारी व सराव करण्यासाठी आणि यातूनच आपल्या देशाच्या सेवेत रुजू होण्यासाठी या सर्व उल्लेखिलेल्या इंटरनेटवरील वेबसाईटसचा उपयोग आपल्याला बराच उपयुक्त ठरेल. 

- मिहिरसिंह नगरकर

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment