An important article not to be missed. This article describes working of various online blood banks and their services which can be availed by us during various medical emergencies. These blood banks not just help us to receive blood donations but also assist us to make the noble and pious task of donation of blood. Shree Aniruddha Upasana Foundation has also been organizing Blood Donation Camps with inspiration of Sadguru Aniruddha Bapu every year on a mammoth scale. Kindly find the article as under which had appeared in the issue of Pratyaksha dated 21st January 2011.
दिल्याशिवाय मिळत नाही
- मिहिर नगरकर
काही दिवसांपूर्वी
एक किस्सा ऐकला. एका मित्राच्या काकांना कोणत्यातरी महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी
इस्पितळात दाखल करावे लागले. शस्त्रक्रियाही लगेच म्हणजे काही तासात करायची होती. शस्त्रक्रियेसाठी
त्यांना रक्ताची तत्काळ गरज होती. ज्या इस्पितळात त्यांना दाखल केले होते त्या इस्पितळाने
सरळ सांगितले, ‘ह्यांच्या रक्ताची सोय तुम्हीच करा. तुम्ही आम्हाला एक बाटली रक्त दिलेत
तरच आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात एक बाटली रक्त देऊ शकतो’. हा व्यावहारिकपणा जो
आपतकाळी अमानवी वाटतो हा सध्या वारंवार अनेक इस्पितळात अनेक रुग्ण व त्यांच्या गरजू
आप्तांना अनुभवायला मिळतो. असे उत्तर मिळाले की त्या रुग्णाच्या नातेवाईकांची पूर्ण
तारांबळ उडते.
सर्वात
पहिला पडणारा प्रश्न म्हणजे माझ्या परिचयातील रक्तदाते कोण असतील व ते आत्ता रक्त
देण्यासाठी पात्र असतील का? त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न हा असतो की आपल्याला गरज
असणार्या विशिष्ट रक्तगटाचे माझ्या परिचयात कोण असतील? आणि मग सुरू होते फोनाफोनी
व धावाधाव. समजा अशा वेळेस जर आपल्याकडे अशा लोकांची यादी असेल ज्यात रक्त देण्यासाठी
पात्र व इच्छुक लोकांची, त्यांच्या रक्तगटाची व संपर्क क्रमांकाची संपूर्ण माहिती असेल
तर? समजा जर अशी सोय उपलब्ध असेल तर आपल्या डोक्याचा तणाव, ताप व त्रास नक्कीच कमी
होईल.
शिवाय अनेक
लोकांची रक्तदान करण्याची इच्छा असूनदेखील ते रक्तदान करू शकत नाहीत, कारण रक्तदान
करण्याच्या जागांचे नसलेले ज्ञान व इस्पितळे व रक्तपेढ्यांशी नसलेला संपर्क व तेथील
वातावरणाबाबत वाटणारी भीती. या कारणांपायी जवळ-जवळ ९०टक्के भावी रक्तदाते, हे रक्त
देण्याच्या अगोदरच मागे फिरताना आढळतात.
www.bharatbloodbank. com, www.friendstosupport. org, www.indiabloodbank.com, ही
काही अशीच संकेतस्थळे आहेत ज्यावर अनेक रक्तदाते रजिस्टर्ड (नोंदणीकृत) आहेत व ह्या
रक्तदात्यांची संपूर्ण माहिती (उदा. नाव, फोन नंबर, रक्तगट, शेवटचे रक्त दिल्याची नोंदणी)
आपल्याला मोफत उपलब्ध आहे. या संकेत स्थळांच्या व्यतिरिक्त ही काही संकेतस्थळे उपलब्ध
आहेत पण वर उल्लेखिलेली संकेतस्थळे वापरण्यास अगदी सामान्य माणसालाही सोपी आहे.
रुग्णांसाठी ऑनलाईन रक्तपेढी :
या सर्व
साईट्सचा प्राथमिक उपयोग हा रक्ताची गरज असणार्या रुग्णांसाठी त्वरित रक्ताची
सोय करणे हा आहे. त्यासाठी या साईट्सवर अगोदर उल्लेखिल्याप्रमाणे रक्तदात्यांची यादी,
त्यांची नावं, संपर्क क्रमांक, रक्तगट, लिंग, इत्यादिंसह असते. ही यादी मिळविताना आपल्या
सोयीसाठी या साईट्सवर (फिल्टर्स) उपलब्ध आहेत ज्यामुळे आपला शोध सोपा होतो.
उदा. समजा
कोणत्या एका व्यक्तीला 'O +ve’ रक्ताची आवश्यकता आहे. तो रुग्ण ‘मुंबईत’ ‘अंधेरीला’,
राहत असेल. तर अशा रुग्णासाठी रक्तदाता शोधताना आपण रक्तगटामध्ये 'O +ve’ निवडणार,
नंतर भारतातील राज्यामध्ये ‘महाराष्ट्र’ निवडणार, त्यानंतर जिल्ह्यामध्ये ‘मुंबई-उपनगर’
निवडणार व शेवटी ‘अंधेरी’ निवडणार. हे सर्व फिल्टर्स आपण लावले की 'O +ve’ रक्तगटाच्या
‘महाराष्ट्रातील’ ‘मुंबई-उपनगराच्या’ ‘अंधेरी’ भागात राहणार्या सर्व रक्तदात्यांची
यादी आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसेल.
रक्तदात्यांची नोंदणी :
रक्तदाते
म्हणून आपण जर या साईट्सवर नोंदणी करत असू तर आपल्याला आपला संपर्क क्रमांक, नाव व
रक्तगट ही आपली वैयक्तिक माहिती ह्या साईट्सवर द्यावी लागते. त्यानंतर आपण या साईट्चे
नोंदणीकृत रक्तदाते होतो. आपली ही वैयक्तिक माहिती सर्व जगाला दिसणार आहे ह्याचेही
भान व तयारी आपण ठेवली पाहिजे कारण रक्ताची गरज असणार्याला (त्याच्या आप्तांना) ह्या
साईट्सवर आपली ही माहिती ऑनलाईन दिसणे गरजेचे आहे (ज्यामुळे ते आपल्याशी त्वरित संपर्क
करू शकतात). पण आपल्या ह्या वैयक्तिक माहिती देण्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल तर
ती द्यायला आपली हरकत नसली पाहिजे. या साईट्वर रक्तदाते म्हणून आपले शारीरिक गुण व
क्षमता काय व किती असली पाहिजे त्याची संपूर्ण यादी (चेकलिस्ट) असते. त्यामुळे आपण
रक्त देण्यासाठी पात्र आहोत का नाही हे आपल्याला तिथल्या तिथे पडताळून बघता येते. रक्तदात्यांना
त्यांची शारीरिक क्षमता सुधारण्यासाठी सल्लेही ह्या साईट्सवर आहेत. त्याशिवाय रक्तदानाबद्दलच्या
गैरसमजुती दूर करण्यासाठी आणि रक्त व रक्तदानाबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी या साईट्सवर
धडे व ज्ञान आपल्यासाठी उपलब्ध आहे.
समजा जर
आपण रक्तदाता म्हणून या साईट्सवर नोंदणी केली आहे पण आपल्याला कोणत्याही कारणाने (शारीरिक
किंवा इतर) काही काळासाठी रक्त देण्यास मनाई असेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर आपण
तसे लॉगिन करून या साईट्सवर सूचित करू शकतो. अशी सूचना दिल्यावर आपण पुन्हा होकारार्थी
सूचना देईपर्यंत ह्या साईट्सवरून आपले नाव प्रदर्शित केले जाणार नाही. त्याशिवाय आपण
एकदा रक्तदान केले की पुढच्या ३ महिन्यांसाठी आपोआप, या साईटसवरच्या यादीतून आपले नाव
काढले जाते (दोन रक्तदानांमधील किमान अंतर ३ महिन्यांचे असावे) व ३ महिन्यांनंतर
आपोआप जोडलेही जाते.
आपण ज्या
समाजात राहतो त्या समाजाप्रती माझी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण रक्तदान केलेच पाहिजे.
असे म्हणतात की ‘दिल्याशिवाय मिळत नाही’. त्यामुळे बांधीलकी वगैरे जड-जड शब्दांचा वापर
न करता आपण जर एवढाच विचार जरी केला की आज जर मी दुसर्याला मदत केली तरच उद्या कधी
माझ्या एखाद्या जवळच्या आप्ताला रक्ताची गरज भासली तरच तो दुसरा धावून येईल.
या साईट्सचे इतर काही फिचर्स :
भारतब्लडबँक.कॉम
व इंडियाब्लडबँक.कॉमवरून आपण आपल्या इतर परिचितांनाही रेफरंस ईमेल पाठवून त्यांना
रक्तदानाकरिता उत्तेजित करू शकतो. या साईट्सवर आपल्या रक्ताचा दर्जा सुधारण्यासाठीची
माहिती व युक्त्यांची यादी दिलेली आहे.
जर आपल्याला
रक्तदानाच्या पवित्र कामात स्वयंसेवक (वॉलेंटियर) म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर
फ्रेंड्सटूसपोर्ट.ऑर्ग वर आपण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करू शकतो.
इंडियाब्लडबँक.कॉम
व भारतब्लडबँक.कॉम या साईट्सवर भारतातील २४० रक्तपेढ्यांची यादी आहे. ह्या यादीत आपण
विशिष्ट राज्य व शहरांमधील रक्तपेढ्यांची माहितीही शोधू शकतो. या यादीत असणार्या रक्तपेढ्यांची
सर्व माहिती (नाव, संपर्क करण्यासाठीची व्यक्ती, संपर्क माहिती, पत्ता इत्यादि) या
साईट्वर उपलब्ध आहे. जर आपल्याला आपली किंवा आपल्या माहितीतील रक्तपेढी या यादीत समाविष्ट
करायची असेल तर तेही आपण करू शकतो.
त्याशिवाय
रक्तदाता म्हणून मला आलेले अनुभव किंवा मिळालेली संतुष्टता, ह्याचे कथनही आपण या साईट्सवर
करु शकतो जे वाचून इतर लोक रक्तदानासाठी उत्तेजित होऊ शकतात.
ऑनलाईन आयबँक :
भारतब्लडबँक.कॉमचीच
अजून एक साईट आहे. www.bharateyebank.org.
या साईट्वर आपण नेत्रदाता (आयडोनर) म्हणून आपली नोंदणी करू शकतो. ह्यासाठी या साईट्वर
आपल्याला मोफत नोंदणी करता येते. ही नोंदणी केली की आपल्याला ह्या साईट्कडून ‘आय प्लेज
कार्ड’ दिले जाते. या काडार्र्चा उपयोग करून आपण आपल्या पश्चात आपल्या डोळ्यांचे दान
करण्याची सूचना व सोय करुन ठेवू शकतो. भारतआयबँक.ऑर्ग सारखेच www.sankaraeye.com व www.rajaneyecare.com ह्या दोन साईटसही आहेत ज्यावरसुद्धा आपण नेत्रदाता म्हणून नोंदणी
करू शकतो. कमालीची गोष्ट म्हणजे www.rajaneyecare.com ह्या साईट्वर डोळ्याच्या रुग्णांना डॉक्टरांचा मोफत ऑनलाईन सल्लाही
मिळतो.
भारतात
दर वर्षी किमान ९० लाख रक्ताच्या बाटल्यांची आवश्यकता असते व त्या गरजेतील ३३ टक्के
गरज अपूर्णच राहते. आपण प्रार्थना करूया की आपल्या कोणत्याही आप्ताला त्याच्या गरजेच्या
वेळेस रक्ताच्या तुटवड्यामुळे यातना व त्रास सोसावा लागू नये. पण समजा तसे झालेच तर?
अशाच वेळेस ‘दिल्या शिवाय मिळत नाही’ हा सिद्धांत आठवतो. पवित्र ग्रथांमध्ये रक्तदान
हे श्रेष्ठ दान असल्याचा उल्लेख सापडतो. त्याशिवाय परमात्म्यानेही ‘एका माणसाने दुसर्या
माणसासाठी केलेल्या रक्ताच्या थेंबाचे दान मला अधिक प्रिय आहे’ असा उल्लेख ग्रंथांमध्ये
केला आहेच. तर मग रक्तदानासाठी तयार आहात ना?
0 comments:
Post a Comment