Publishing my article that had appeared in Dainik Pratyaksha on 4th March 2011 on www.indiahospitalbeds.org. This site provided availability of hospital bed for patients. Unfortunately this site has closed down now. We have there would be some site like this in near future which would cover all the hospitals so that patients and their relatives in need are convenienced.
I am also happy to let you know about one very different project that I came across. It is the Institute of Geriatrics & Research Centre at Juinagar near Mumbai. It is the vision of Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi (Sadguru Aniruddha Bapu) of having a comprehensive facility that will tend to the old, aged and infirm, who do not have the sound financial means to support their expensive medical needs, is taking shape and will come to fruition in the coming months. To know more you may click here.
रुग्णालयांची उपलब्धता जाणून घेण्यासाठी....
माझ्या मित्राच्या काकांना
काही काळापूर्वी किडनी स्टोनचा अचानक त्रास झाला. त्यांना डॉक्टरांनी लगेचच शस्त्रक्रिया
करून घ्यायला सांगितले. त्यामुळे लगेचच शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयाचा शोध सुरू
झाला. नेमका तो पावसाळ्याचा मोसम होता व सगळी रुग्णालये पूर्णपणे भरलेली होती. त्यामुळे
खूप शोध घेतल्यानंतरच त्यांना रुग्णालयात जागा मिळाली. ह्या सगळ्या धावपळीत त्यांचा
खूप वेळ तर गेलाच पण त्याचबरोबर मन:स्तापही भरपूर सहन करावा लागला. समजा अशा वेळेस
त्यांना ह्या प्रसंगात अशी सुविधा मिळाली असती ज्यामुळे त्यांना अनेक रुग्णालयातील
जागांची उपलब्धता एकाच ठिकाणी कळली असती तर... त्यांचा वेळही कमी खर्च झाला असता व
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मन:स्ताप खूप कमी झाला असता. ही अडचण सोडवण्यासाठीच आपल्याला http://indiahospitalbeds.org या वेबसाईटचा उपयोग करता येऊ शकतो.
http://indiahospitalbeds.org ह्या साईटवर मुंबई व आसपासच्या परिसरातील काही रुग्णालये उदा: खंबाला
हिल रुग्णालय - केम्प्स् कॉर्नर, होली फॅमिली रुग्णालय - वांन्द्रे, इनलॅकस् रुग्णालय
- चेंबूर, कोहिनूर रुग्णालय - कुर्ला, लोक रुग्णालय - ठाणे, एम.जी.एम. रुग्णालय - नवी
मुंबई, सूचक रुग्णालय - मालाड आणि सेंट एलिजाबेथ रुग्णालय - मलबार हिल ही नोंदणीकृत
आहेत. ह्या साईटवर आपण ह्या रुग्णालयातील जागांची उपलब्धता ऑनलाईन पडताळू शकतो व तेही
कोणती नोंदणीही न करता व अगदी मोफत. ही उपलब्धता आपल्याला तेथील असलेल्या रुम्सच्या
प्रकारासकट मिळते उदा: आय.सी.यू. ए.सी. सिंगल, डिलक्स, ट्वीन शेअरींग इत्यादि. ही उपलब्धता
कळण्यासाठी आपल्याला ह्या साईटवर जावे लागते. त्यानंतर त्यांच्या होम
पेज (Home Page) ह्या सार्या रुग्णालयांची यादी दिलेली असते. ह्या यादीतील रुग्णालयांच्या नावांना
हायपरलिंक केले आहे. त्यामुळे ह्या हायपरलिंकवर आपण क्लिक केले की त्या रुग्णालयाच्या
रुम्सच्या प्रकारासकट त्यांची उपलब्धता आपल्याला एका तखत्याचा स्वरूपात कळते. त्याशिवाय
या रुग्णालयातील सर्व सुविधांची यादीसुध्दा आपल्याला ह्याच लिंकवर उपलब्ध होते.
ह्या साईटवर
जरी आत्ता फक्त मुंबईतील रुग्णालयांची माहिती असली तरी ह्या साईटच्या व्यवस्थापकांच्या
मते लवकरच या साईटवर संपूर्ण भारतातील, सर्व शहरातील रुग्णालय व नर्सिंग होमस्ना
समाविष्ट करून घेणार आहेत. ह्या साईटवर रुग्णालयांची नोंदणीसुध्दा मोङ्गत करता येते.
त्यामुळे खरं तर एवढ्या चांगल्या उपक्रमाला रुग्णालयांनी स्वत:हून प्रतिसाद द्यायला
हवा. पण तरी ह्या साईटवर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, आत्तापर्यंत फक्त आठ रुग्णालयांनीच
याच साईटवर आपली नोंदणी केली आहे जी अनाकलनीय आहे. ह्या नोंदणीकृत रुग्णालयांची यादी
वाढली तर ह्याचा ङ्गायदा सर्वांनाच म्हणजे रुग्ण व त्यांचे नातेवाईक, रुग्णालये व या
साईटला ही नक्कीच होईल. ते कसे ते आपण खाली पाहूयाच.
ह्या साईटचे फायदे
रुग्णालयांचे
दूरध्वनी क्रमांक काही वेळेस त्यांच्यावर असणार्या भारामुळे लागत नाहीत. तर काही वेळेला
आपल्याला हवी असणारी उत्तरे आपल्याला रुग्णालयांच्या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावरून
मिळत नाही. त्यामुळे ह्या साईटचा अशा वेळेस आपल्याला चांगला उपयोग होतो. शिवाय अगोदर
म्हटल्याप्रमाणे आपल्याला रुग्णालय शोधताना होणारा मन:स्ताप व वेळही वाचतोच.
ह्या साईटमुळे
रुग्णालयांनाही त्यांच्या क्षमतेचा पूर्ण लाभ उठवता येईल. अगदी व्यावसायिक भाषेतच बोलायचे
झाले तर ह्या साईटमुळे रुग्णालयांना त्यांचे उत्पन्न वाढवायला फायदाच होईल. ही साईट
सर्व नोंदणीकृत रुग्णालयांना ह्या साईटवरूनच त्या रुग्णालयांच्या अधिकृत साईटशी जोडण्यासही
मोकळीक देते. त्याशिवाय ह्या साईटवरच आपल्याला रुग्णालयांची उपलब्धता समजत असल्या कारणाने
एका डॉक्टरांना दुसर्या डॉक्टरांकडे, तज्ञ डॉक्टर किंवा रुग्णालयाकडे आपल्या रुग्णास
र्निर्देशित करण्यास मदत होऊ शकते. ह्या साईटवरील रुग्णालयांची उपलब्धता त्या रुग्णालयांनाच
अद्ययावत करावी लागते.
रुग्णालयांच्या
साईटवर मिळणार्या
इतर सुविधा
हल्ली अनेक
रुग्णालये आपल्याच अधिकृत साईटवर त्यांच्या रुग्णालयाच्या पॅनलवर असणार्या डॉक्टरांच्या
उपलब्ध दिवसांची यादी ज्यात त्यांचे नाव विशेषज्ञता (Speciality) प्रदर्शित करतात. शिवाय
रुग्णांना ह्या डॉक्टरांची भेट (Appointment) घ्यायची असल्यास डॉक्टरांना किंवा त्या
रुग्णालयाला फोन करण्याची गरज सुध्दा उरत नाही कारण ही यादी पाहून रुग्णांना ह्याच
साईटवर ह्याच डॉक्टरांची अपॉइंटमेंटही ऑनलाईनच घेता येते. उदाहरणच द्यायचे झाले तर
बांद्र्यातील लीलावती रुग्णालय व अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या साईटवर ह्या
दोनही सुविधा उपलब्ध आहेत.
याव्यतिरिक्त
आपल्या सर्वांना ठाऊक आहेच की माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपण रुग्णवाहिका ही
त्वरित बोलावू शकतो. त्यासाठी १०८, १०२ व १२९८ हे प्रचलित दूरध्वनी हेल्पलाइन क्रमांक आहेत. ह्या हेल्पलाइन्सवर ङ्गोन केल्यावर आपण रुग्णवाहिका बोलावू शकतो. रुग्णवाहिका
बोलावयाच्या वेळेस इंटरनेट बघावयास वेळ नसतोच. त्यामुळेच आपण रुग्णवाहिका बोलावण्यासाठीच्या
साईटस् बघणार नाही.
स्वास्थ्य
सेवा व माहिती तंत्रज्ञानाचाच विषय चालला आहे म्हणून वाचकांना एक आठवण करून द्यावीशी
वाटली व ती म्हणजे आपण ह्याच लेख मालिकेत अगोदरच्या एका भागात रक्त मिळवण्यासाठीच्या
मोफत साईस्द्दटीमबद्दल जाणून घेतलेच आहे.
भारतात अजूनही
स्वास्थ्य सेवा इतर प्रगत देशांसारख्या सर्व सामान्य नागरिकाला सहज उपलब्ध नाहीत. एका आकडेवारी
प्रमाणे आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार कोणत्याही देशात प्रत्येकी १००० लोकांच्यापाठी
३.९६ हॉस्पिटलमधील जागा (बेड्स) असणे गरजेचे
आहे. त्या विरुध्द भारतात हे प्रमाण अवघे ०.७ इतकेच आहे.
अशा परिस्थितीत
या साईटचे महत्त्व अधिकच वाढते. म्हणूनच रुग्णांनी व रुग्णालयांनी या साईटकडे अधिक
गंभीर्याने पहायला हवे.
0 comments:
Post a Comment