latest Post

दुरून डोंगर साजरे (Online Meetings, Webinars & Video Conferencing)

Its been more than a year since I have published my Freewares and websites related blogposts. Today after a long break I am once again commencing with publishing of them. Today we will be seeing various options that can be trusted for Online Presentation, Remote Access and Webinars. 



गेल्या आठवड्यात एका प्रेझेंटेशनसाठी साकीनाक्याला जायचं होतं . तीनची मिटींग होती म्हणून दादरहून ऑफिसमधून २ वाजता निघालो. एका तासात तर सहज पोहोचू असं वाटलं होतं. पण ३च्या ऐवजी ४ वाजता पोहोचलो. त्यामुळे त्या दिवशीची मिटींग तर रद्द झाली, शिवाय बॉसची बोलणीही खावी लागली. त्या दिवशी असा मनात विचार आला की जर आपल्याला ऑफिसमधूनच, आपल्याच संगणकावरून जर हे प्रेझेंटेशन देता आले असते तर मिटींग नक्कीच चांगली झाली असती व बॉसची बोलणी खाण्याच्या ऐवजी शाबासकी मिळाली असती. ह्याच आलेल्या विचाराला संगणकाच्या जगतात वेबीनार (Webinar) असे म्हणतात. त्यामुळे, कोणती वेबसाईट आपल्याला वेबीनारची सोय देऊ शकते त्याचा शोध घेतला आणि काही चांगले पर्याय हाती लागले. www.skype.com, www.teamviewer.com, www.mikogo.com हे वेबीनार व इतर रिमोट सुविधांसाठीचे उत्तम व मोफत पर्याय आहेत. ह्या साईटस्चा उपयोग करून आपल्याला कोणत्या सुविधा मोफत मिळू शकतात ते आपण आता पाहूया.

वेब कॉन्फरन्स
     आपण आपल्या संगणकावर काय करत आहोत तेवढेच दुसर्‍याच्या संगणकावर त्याला इंटरनेटच्या माध्यमातून दिसणे म्हणजेच वेब कॉन्फरंसिंग व ह्यालाच वेबीनार असेही म्हणतात. वेब  कॉन्फरन्सचा उपयोग आपल्याला प्रेझेंटेशन्स्साठी खूप चांगल्या प्रकारे करता येतो. त्याशिवाय आपल्याला कोणत्याही दुसर्‍या व्यक्तीला जर आपले दस्तावेज, व्हिडिओज्, चित्र (images) ई-मेल न करता दाखवायचे असतील, त्यावेळेसही आपल्याला ह्या सुविधेचा उपयोग करता येतो. वेब  कॉन्फरन्स सुरू करण्यासाठी आपल्याला ह्या तीनही साईटस्चे अॅप्लिकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागते. त्यानंतर ज्या वेळेस आपल्याला वेब कॉन्फरंस् किंवा ऑनलाईन प्रेझेंटेशन द्यायचे असेल त्यावेळेस फक्त ते अॅप्लिकेशन रन करावे लागते. दुसर्‍याला ज्याला हे प्रेझेंटेशन दाखवायचे असेल किंवा वेब कॉन्फरंस्मध्ये सहभागी करून घ्यायचे असेल त्याच्या संगणकावर हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल असणे गरजेचे नसते. त्याशिवाय प्रत्येक वेब कॉन्फरंस् किंवा ऑनलाईन प्रेझेंटेशनला युनिक मिटींग आय.डी. (Unique ID) दिला जातो. ह्या आयडीमुळेच हा आयडी माहीत असलेल्यालाच म्हणजे फक्त प्रेझेंटेशन देणारी व बघणारी व्यक्तीच फक्त हे प्रेझेंटेशन बघू शकते त्याशिवाय जो अॅक्सेस आपण समोरच्या व्यक्तिस देत आहोत तो सक्रिय (अॅक्टीव्ह) नसल्यामुळे व तात्पुरता असल्याने आपण तो संपविल्यावर समोरच्या व्यक्तिला आपल्या संगणकाला ऍक्सेस मिळत नाही व ती व्यक्ती त्यामुळे आपल्या संगणकावरील माहिती (data) आपल्या नकळत वाचू किंवा घेऊ शकत नाही.

     ह्या वेब कॉन्फरंसिंगचा उपयोग शिक्षण क्षेत्रात हल्ली खूप वाढला आहे. ह्या तंत्रज्ञानाच्या सोईने अनेक स्नातकोत्तर (Post Graduate) कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. ह्या प्रकारच्या शिक्षणाला व्हर्च्युअल लर्निंग असे म्हटले जाते. ह्यामध्ये विद्यापीठ एका शहरात व विद्यार्थी दुसर्‍या शहरात एकाच वेळेस असून देखील ते त्या विद्यापीठातील व्याख्यानांना हजर राहू शकतात. अर्थात ही हजेरी ऑनलाईन असते व व्याख्याने ही ऑनलाईनच घेतली जातात. वेब कॉन्फरंसिंग सारखेच ह्या अधिवेशनाला (session) एक युनिक आय.डी. दिला जातो. व्याख्यान सुरू झाले की त्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन केले जाते. विद्यार्थ्यांनी त्या विद्यापीठाच्या साईटवर ऑनलाईन लॉगीन करून ह्या व्याख्यानाचे थेट प्रकाशन पहावयाचे असते. स्वत:च्या संगणकावरून फक्त व्याख्यान पाहता येते. पण जर आपल्याला काही प्रश्‍न विचारुन, संवाद साधायचा असेल तर आपल्याला ह्या विद्यापीठांच्या शिक्षण केंद्रावर (Learning Centre) जाऊन व्याख्यानासाठी हजर रहावे लागते. तेथे गेल्यावर आपल्याला त्यांच्या मायक्रोफोन, हेडफोन इत्यादी साहित्यांच्या व तंत्रज्ञानाच्या उपयोगाने प्राध्यापकांशी संवाद साधता येतो. ह्याला इंटरऍटिव्ह व्हर्च्युअल लर्निंग (Interactive Virtual Learning) असे संबोधले जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर एन.आय.आय.टी. इंपेरिया (NIIT Imperia) ही इंटरऍटिव्ह व्हर्च्युअल लर्निंगच्या माध्यमातून डिप्लोमा प्रदान करणारी संस्था आहे. 

रिमोट सपोर्ट व ऍक्सेस
     हल्ली प्रत्येक कंपनीमध्ये निदान एक तरी सॉफ्टवेअर वापरले जाते. काहीच नाही तरी निदान अकाऊंट्ससाठी तरी निदान एक तरी सॉफ्टवेअर असतेच-असते. ही सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करायला हल्ली सर्वच सॉफ्टवेअर कंपन्या रिमोट ऍक्सेस (Remote Access) घेऊन इन्स्टॉलेशन करणे पसंत करतात. रिमोट ऍक्सेस म्हणजे आपल्या संगणकावरून आपण दुसर्‍याच्या संगणकावर काम करणे. ह्या रिमोट ऍक्सेसच्या वेळेस जसे काही आपण स्वत:चाच संगणक वापरत आहोत तसेच आपल्याला दुसर्‍याचा संगणक वापरता येतो. इन्स्टॉलेशनच्या व्यतिरिक्त, ज्यावेळेस आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कोणताही एरर (error) येतो तेव्हा खूप वेळेस रिमोट ऍक्सेसच्याच माध्यमाने तंत्रज्ञाकडून ती त्रुटी सोडवली जाते. त्यामुळे तंत्रज्ञांचा वेळ तर वाचतोच पण त्याशिवाय आपले कामही खोळंबून राहत नाही. ह्या रिमोट सपोर्टचा उपयोग खास करून त्या आस्थापनांना सर्वात जास्त होतो ज्यांचा व्यवहार संपूर्णपणे सॉफ्टवेअर्स व इंटरनेटवरच अवलंबून आहे उदा: समभाग व्यापार आस्थापने (Stock Broking Firms). 

  वरील उल्लेखिलेल्या सर्व सुविधा www.skype.comwww.teamviewer.comव www.mikogo.com ह्या तीनही साईटस्वर उपलब्ध आहेत. त्याशिवाय www.teamviewer.com वर आपल्याला फाईल्स् व फोल्डर्सचेही ऑनलाईन स्थानांतरण (transfer) करता येते. यात अगदी वजनी  (heavy) फाईल्स् व फोल्डर्स ज्यांचे ई-मेल वरून स्थानांतरण करणे कठीण असते त्या ही स्थानांतरित करता येतात.

     ह्या तीनही साईटस्‌मध्ये www.skype.com वर सर्वात जास्त सुविधा उपलब्ध आहेत. वर उल्लेखिलेल्या सर्व सुविधांच्या शिवाय आपल्याला स्काईप वर अनेक मोफत सुविधा उपलब्ध आहेत उदा: आवाज व व्हिडिओ कॉलिंग (individual or group), कॉल ओळख (Caller identification) आणि इंस्टंट मेसेजींग. पण या सार्‍या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ज्या व्यक्तिशी संवाद साधायचा आहे त्यांच्या संगणकावर स्काईप इन्स्टॉल्ड असणे गरजेचे असते. त्याशिवाय स्काईप वर आपल्याला व्हाईसमेल, इतर सर्व नंबरवर देशातील व इतर दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या (Service Provider) नंबर्सवर कॉल्स, कॉल पुनर्निर्देशन (call diversion), इत्यादी सुविधा ही उपलब्ध होऊ शकतात पण त्या मोफत नाही. तरीही खरंच गरज असणार्‍यास त्या स्वस्तात नक्कीच मिळतात.

     २००८ साली आर्थिक मंदीची झळ सोसल्यापासून सर्वच कंपन्या आता ताकही फुंकून पीत आहेत. ह्याच काळात ह्या कंपन्या आपला वायफळ खर्च, वेळ व मनुष्यबळ (manpower) कापण्यास व उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग करण्यास शिकल्या आहेत. वर उल्लेखिलेल्या सर्वच साईटस् ह्या सर्व उद्योजकांना खर्च कमी करून वेळ व मनुष्यबळ वाचवून त्यांच्या साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करण्यास नक्कीच मदत करू शकतात. वेळ, मनुष्यबळ यांची बचत करणार्‍या ह्या तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने होत असताना, पुढच्या काळात या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होत जाईल यात शंकाच नाही. मग आपण याबाबतीत मागे का रहायचं?

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment