latest Post

दिव्यदृष्टी - Live Video Streaming

Today I am republishing my article dated 25 February 2011 that was earlier published in Dainik Pratyaksha on sites offering free Live Video Streaming. I am very happy that I was part of the team of Shraddhavans that started the live streaming activities related to Sadguru Aniruddha Bapu. Today we are operating a full-fledged channel by the name Aniruddha TV that broadcasts weekly upasana conducted at Bandra in presence of Sadguru Aniruddha Bapu



मागे एक घडलेसा किस्सा आठवतो. माझ्या एक मित्राचं लग्न होतं. लग्नाच्या पंधरा दिवस अगोदर त्याच्या भावाला त्याच्या ऑफिसकडून तातडीने कॅनडाला पाठविण्यात येणार म्हणून कळले. त्याची ही बदली फक्त सहा महिन्यांसाठी होती, ज्या प्रोजेक्टसाठी जायचे होते तो अत्यंत मोठा महत्त्वाचा प्रोजेक्ट होता. त्यासाठी भारतातून फक्त जणच त्याच्या ऑफिसने निवडले होते. त्यामुळे घरातील सर्वांच्या संमतीने असे ठरले की जरी सख्ख्या भावाचे लग्न असले तरी ह्याने कॅनडाला जायचे. पण आपल्या सख्ख्या लाडक्या भावाचे लग्न स्वत:च्या डोळ्यांनी बघता येणार नाही ह्याची खंत त्याच्या मनात होतीच. दुधाची तहान ताकावर भागविण्यासाठी कोणी त्याला बोलले की लग्नाचे फोटो बघ, तर कुणी लग्नाचा व्हिडिओ पाहता येईल असं सांगून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी ह्या समस्येवर तोडगा संगणक महाराजचं देऊ शकतात असा विचार करून त्याने इंटरनेटवर शोध घेतला उत्तर मिळाले ही ते म्हणजे लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग (Live Video Streaming). लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग म्हणजे आपण ज्या जागी आहोत, तेथील घडणार्‍या घटनांचे संगणक, कॅमेरा / वेबकॅम इंटरनेटच्या माध्यमाने थेट प्रक्षेपण करणे, अगदी क्रिकेटच्या सामन्यासारखेच.

प्रसारण करण्यासाठी लागणार्‍या कमीत-कमी सुविधा
www.ustream.tv, www.justin.tv, http://qik.com, www.nchsoftware.com, इत्यादी साईटस्‌चा उपयोग करून आपण मोफत लाईव्ह व्हिडीयो स्ट्रीमिंग करू शकतो. लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग करण्यासाठी आपल्याला एच.डी. (हाय डेफिनिशन) - म्हणजेच १२८० x ७२० पिक्सेल्स्‌चा कॅमेरा (संगणकाला जोडलेला), संगणक (लॅपटॉप किंवा डेस्कटॉप), मायक्रोफोन ऍडबचे फ्लॅश प्लेयर (जे मोफत डाऊनलोड करता येते), वरील पैकी कोणत्याही साईटचे मोफत मिळणारे सॉफ्टवेअर, आपल्या संगणकावर इन्स्टॉल्ड असणे गरजेचे आहे. शिवाय कमीत-कमी एम.बी.पी.एस. गतीचे (स्पीड) इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असते. आपला हा इंटरनेटचा स्पीड तपासायचा असेल तर www.speedtest.net या साईटवर आपल्याला तो मोफत तपासून त्याची इत्थंभूत आकडेवारी कळते. (त्यामुळे ह्या साईटचा उपयोग आपण इंटरनेट सेवादाता निवडताना देखील करू शकतो).

व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी आपण पुढील पैकी कोणताही कॅमेरा वापरू शकतो उदा: आपल्या लॅपटॉप मध्येच असलेला (Inbuilt) कॅमेरा, कॅमकॉरडर, वेबकॅम, व्यावसायिक कॅमेरा सर्वात सोपे म्हणजे मोबाईल फोनमधील कॅमेरासुध्दा वापरता येतो. व्हिडिओज्ची चांगली क्वालिटी मिळविण्यासाठी आपल्याला ऍडबचे फ्लॅश मीडिया एनकोडर (एफ.एम.एल..) जे मोफत  डाऊनलोड करता येते ते आपल्या संगणकावर इन्स्टॉल्ड असावे लागते. शिवाय व्हिडिओजचा दर्जा उत्तम राखण्यासाठी शक्यतो वायर्ड (इथरनेट) इंटरनेट असावे लागते.

प्रसारण कसे करावे?
आपल्याला ऑडियो व्हिडिओ असे दोन्ही प्रकारचे प्रसारण करता येते. ऑडियो प्रसारणात फक्त आवाजाचे   व्हिडिओ प्रसारणात आवाज चलचित्र दोन्हींचे प्रसारण करता येते. आपल्या संगणकावर आपला ऑडियो, स्टीरियो किंवा वेव्ह-आऊटपूट मिक्सला सेट करावा लागतो. त्यानंतर आपल्याला वर म्हटलेल्या साईटस्वर उपलब्ध असणारे सॉफ्टवेअर रन करावे लागते. त्यानंतर आपल्याला वर उल्लेखिलेल्या साईटस् वर लॉगीन करावे लागते. त्यानंतर आपल्याला काय प्रसारित करायचे आहे (व्हिडिओज् किंवा आपल्या डेस्कटॉप वरील फाईल्स्) ते निवडावे लागते. आपल्याला ह्या प्रसारणाचे गुण-वैशिष्ठ (Features) उदा: प्रसारणाच्या पटलाचा (Screen) आकार, इनपूट डिवाइस इत्यादी निवडता येतात. कॅमेरा डेस्कटॉपच्या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या टी.व्ही.वर सुरू असणारे कार्यक्रमांचेदेखील प्रसारण करता येते. पण त्यासाठी आपल्याकडे कोणताही व्हिडिओ कॅप्चर डीवाईस असणे गरजेच असते. उदा: .डी.एस.टेकपायरो /वी लिंक, इत्यादी. आपल्याला आपले प्रसारण अधिक चांगले प्रदर्शनीय बनविण्यासाठी मजकूर (Scrolling text), चित्र, आर.एस.एस. फीड, खास अतिथी विंडो, दुसरे  व्हिडिओव्हिडिओे इफेक्टस्, ग्राफिक्स, इत्यादी ही आपण प्रसारित करणार्‍या  व्हिडिओमध्ये घालता येतात. आपण बातम्यांमध्ये पाहिलेच असेल मुलाखत घेणार्‍या समाचार समालोचक (Newsreader) दोन-तीन शहरातील व्यक्तिंची एकाच वेळेस मुलाखत घेत असतो. त्या सर्व लोकांना एकाच पटलावर (screen) दाखवले जाते. त्याच प्रमाणे आपल्याला आपल्या स्ट्रीममध्ये एका पेक्षा अधिक  व्हिडिओज्‌च प्रसारण एकाच वेळेस करता येते. ह्यालाच को-होस्टींग असे म्हणतात. ह्या सर्व साईटस्वर आपल्याला को-होस्टींगची सुविधाही उपलब्ध आहे.

वरील सर्व प्रक्रिया थोडी जटील अधिक तंत्रज्ञानिक असल्या कारणाने या साईटस्वर उपयोगकर्त्यांसाठी विस्तृत उपयोगकरिता पुस्तिका (User Manual) उपलब्ध आहे. शिवाय सर्वसाधारणपणे उपभोगत्यांना पडणार्‍या प्रश्‍नांचा संचय ही या साईटस्वर आहे. त्याशिवाय ह्या साईटस्वर आपण चॅटरुमस्ही बनवू शकतो. महत्त्वाचे म्हणजे हे व्हिडिओज्‌चे प्रसारण करताना आपण इतरांच्या भावना दुखाविल्या जाणार नाहीत ते असामाजिक नाहीत ह्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसे केल्यास विनाकारण आपल्यामुळे इतरांना नंतर आपल्याला त्रास होऊ शकतो.

प्रसारण कसे बघावे?
आपण जे प्रसारण करतो ते इतरांना दिसण्यासाठी एक समर्पित (dedicated) चॅनल दिले जाते जी एक हायपरलिंक असते. ह्या लिंकवर क्लिक केले की आपल्याला ह्या चॅनलवरील व्हिडिओज् बघता येतो.

व्हिडिओ स्ट्रीमिंग तंत्रज्ञानाचा हल्ली व्यापारातही बराच उपयोग बाढला आहे. ह्या व्हिडिओचा हल्ली अनेक कंपन्या, पुढारी, अभिनेते आपली उत्पादने, सेवा ख्यातीची जाहिरात करण्यासाठी भरपूर उपयोग करत आहेत. शिवाय ह्या सर्व साईटस्वरचे व्हिडिओेज् आपण ह्या साईटवरुनच थेट ट्विटर, फेसबूक, यूट्यूब, इत्यादी वरही प्रकाशित करू शकतो. त्याशिवाय ह्या साईटस्च्या द्वारे www.skype.com वर जोडले जाऊन आपण थेट  व्हिडिओ मिटींगसुद्धा घेऊ शकतो.

ह्या दोन साईटस्च्या व्यतिरिक्त http://qik.com ही सुद्धा एक साईट खासकरून मोबाईलवरून चित्रित केलेल्या  व्हिडिओेज्चे थेट किंवा ध्वनिमुद्रीत (recorded) प्रसारण करण्यासाठी वापरली जाते कारण ही साईट १४० प्रकारच्या मोबाईल्स्ला सपोर्ट करते. ह्या साईटचेही ट्विटर, फेसबूक यूट्यूबशी समाकलन (integration) केलेले आहे. प्रसारण करण्यासाठी  मोबाईलमध्ये जी.पी.आर.एस. असणे गरजेचे आहे.

व्हिडिओज्चाच विषय चालला आहे तर आपण जगातील सर्वात प्रसिद्ध व्हिडिओे शेअरिंग साईट म्हणजेच www.youtube.com विषयी सुद्धा थोडे जाणून घेऊया. ह्या साईटवर जगातील असंख्य ध्वनिमुद्रीत (recorded) व्हिडिओज् रोज अपलोड केले जातात. एक वेगळी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ह्या साईटस्‌च्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टींना उदा: जगातील लोकशाहीला दडपणार्‍या ताकदींचा नराधमपणा, काही सरकारी अधिकार्‍यांचा भ्रष्टाचार, इत्यादी संपूर्ण जगासमोर आणायला जनतेला ह्या साईटस्चे अत्यंत चांगले व्यासपीठ मिळाले आहे. म्हणूनच कदाचित चीन, इराण, ट्युनिशीया सारख्या हुकूमशाही व्यवस्था असणार्‍या देशात यूट्युबवर बंदी आहे. यूट्युबवर टी.व्ही. वर चालणार्‍या सर्व मालिकांचे सर्व भाग (episodes), सर्व खेळाचे सामने, सिनेमाचे भाग गाणी, इत्यादींचे  व्हिडिओेज् असतात. त्यामुळे कोणताही मलिकेतील भाग, खेळाच्या सामन्यातील काही भाग जर आपल्याकडून पाहण्याचा राहिला असल्यास तो आपण आपल्या सोईने यूट्युबवर बघू शकतो. 

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment