latest Post

इंटरनेटवरची खाऊ गल्ली

I am a foodie at heart. Especially when it comes to non-vegetarian food, soups and salads I love it the most. Today I am publishing my article of food and hotels website that was published in Dainik Pratyaksha on 11th March 2011. 

Recently I have changed by food habits. This all happened after 13th December 2014. It was the day when Sadguru Aniruddha Bapu or rather I would say Dr. Aniruddha Joshi delivered a lecture on Self-Health and Food. Bapu himself is a MD doctor. His lecture was an eye-opener for all the Shraddhavans and has helped us all in taking our fitness to marvellous levels. 




इंटरनेटवरची खाऊ गल्ली

जेवण-खाण सोडून हा सदानकदा इंटरनेटवर बसलेला असतो, अशा कित्येक  घरातल्या आई तक्रारी करीत असतात. इंटरनेटनेच पोट भरणार का? असा प्रश्‍नही त्या आपल्या लेकाला किंवा लेकीला विचारतात. भूक भागवायची असेल, तर अन्नावाचून पर्याय नाही. पण या कामी इंटरनेट आपल्याला अजिबात मदत करू शकत नाही, असा जर आपला समज असेल, तर तो चुकीचा आहे. उदरभरणाची ‘सोय’ इंटरनेटवरून करता येऊ शकते. खवैयेगिरीची हौस भागविण्यासाठी इंटरनेट आपल्याला मदत करू शकतो. कसं, तेच आज आपण पाहणार आहोत. 

डब्बा सेवादाते
सर्वात आधी आपण पाहूया जग प्रसिध्द डबेवाल्यांबद्दल. जागतिकीकरणामुळे आज नोकरी-व्यवसाय करण्यासाठी शहरांच्या सीमा राहिल्या नाहीत. भारतातील कोणत्याही एका भागातील माणूस दुसर्‍या कोणत्याही भागात नोकरी-व्यवसाय करताना सर्रासपणे आढळतो. माणूस घराबाहेर असला की त्याला सर्वात जास्त कमतरता जाणवते ती म्हणजे घराच्या माणसांची व आई किंवा बायकोच्या हातच्या जेवणाची. अशा वेळेस जर घरच्या चवीचे अन्न कुठे मिळाले तर माणसाला ते हॉटेलच्या अन्नापेक्षा अधिक प्रिय वाटते. अशाच वेळेस आपल्याकडे 'डबेवाला' हा एक उत्तम पर्याय असतो. हे डबेवाले सकस व अगदी घरच्या चवीचे अन्न पुरविण्यासाठी जगप्रसिध्द आहेत. पण चांगल्या डबेवाल्यांना शोधणे हीसुद्धा एक कठीण गोष्ट आहे. त्यावेळेस www.foodizm.in  www.bhojantime.com/pune-tiffin-service ह्या व इतर साईटस्‌ आपल्या मदतीला येऊ शकतात. ह्या साईटवर भारतातील  प्रमुख शहरातील उदा: मुंबई, पुणे, बंगळुरु, हैद्राबाद, अहमदाबाद, दिल्ली, इत्यादी शहरांममध्ये डब्यांची सेवा पूरविणार्‍या सेवादात्यांची यादी मोफत मिळवता येते.


ग्राहक म्हणून ह्या साईटवर आपण गेलो की आपल्याला सर्वात पहिले ज्या शहरातील डब्बेवाल्यांची माहिती हवी आहे त्या शहराची निवड करावी लागते. त्या शिवाय आपण विशिष्ठ शोधशब्द (Keywords) टाकून आपल्याला हव्या असणार्‍या भगातील किंवा हव्या असणार्‍या खाद्यशैलीप्रमाणे ह्या डब्बा-सेवादात्यांची यादी काढू शकतो. ह्या यादीत दिलेल्या सेवादात्यांच्या नावावर क्लिक केले की आपल्याला ह्या सेवादात्यांची संपूर्ण माहिती मिळते उदा: ते कोणत्या भागात सेवा पुरवतात, त्यांची खाद्यशैली, शाकाहारी-मांसाहारी अन्न, रात्रीचे का सकाळचे जेवण व तेथील संपर्क साधण्यासाठीची व्यक्ती व तीचा संपर्क क्रमांक, इत्यादि सारी माहिती मिळते. ह्या माहितीच्या आधारे आपण ह्या साईटवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर या सेवादात्यांशी थेट संपर्क साधू शकतो. जर आपल्याला सेवादाता म्हणून ह्या साईटवर नोदणी करायची असेल तर तीसुद्धा आपण मोफत करु शकतो. 


हॉटेल व रेस्टॉरंटस्
हल्ली हॉटेल, रेस्टॉरंटस्मध्ये जेवायला जायचा कल, शहरी भाषेत ट्रेंड वाढला आहे. पूर्वी रेशनच्या दुकानाबाहेर रांगा लागायच्या त्याप्रमाणे हल्ली हॉटेलस्च्या बाहेर रांगा असतात. रविवारीतर जर आपण हॉटेलमध्ये जेवायला जायचे म्हटले तर कमीत-कमी अर्धातास तरी वेटींगमध्ये थांबावे लागते. हा वेळ जर वाचवायचा असेल तर आपल्या मदतीला www.justeat.in ही साईट येऊ शकते. ह्या साईटवर मुंबई, दिल्ली व बंगळुरु मधील  रेस्टॉरंटस् नोंदणीकृत आहेत. ह्या सर्व रेस्टॉरंटस्मध्ये आपण ऑनलाईन टेबलचे बुकिंग करू शकतो. त्याशिवाय ह्याच रेस्टॉरंट्सना आपण मोफत होम डिलिव्हरीसाठी ऑनलाईन ऑर्डरही देऊ शकतो. ह्याच साईटवर विविध भारतीय खाद्य पदार्थांच्या पाककृती (रेसेपीज्) सुद्धा आहेत. शिवाय ह्याच साईटवर आपण विविध रेस्टॉरंटस्ची कुपनस्ही विकत घेऊ शकतो. ती आपल्याला व्यवहारासाठी कधीही वापरता येतात. 

www.orderplz.com ह्या साईटवरुन सुद्धा आपल्याला भारतातील  शहरांमधील रेस्टॉरंटस्ची मेन्यूकार्ड पाहून ऑनलाईन मोफत होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर देता येते. त्याशिवाय सर्व नोंदणीकृत रेस्टॉरंटस्चे संपर्क क्रमांकसुध्दा ह्या साईटवर आहेत. त्यामुळे आपण ह्या रेस्टॉरंटस्शी थेट संपर्कसुध्दा करू शकतो. www.mealtree.com म्हणून अशीसुद्धा एक साईट आहे. ह्या साईटवर मुंबईतील बरीच रेस्टॉरंटस् नोदणीकृत आहेत. ह्या रेस्टॉरंटस्ना आपण ही साईट वापरून ऑनलाईन मोफत होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर देऊ शकतो. ह्या सर्व साईटस्वरुन बुक केलेल्या ऑर्डर्स्वर आपल्याला १०-२०% टक्के इतकी बिलात सवलत देखील मिळते. ह्या सर्व साईटस्चा उपयोग आपल्याला ग्राहक म्हणून मोफत आहे. त्याशिवाय ऑनलाईन पेमेंट किंवा ऑन डिलिव्हरी पेमेंट करण्याची सोय सुध्दा ह्या साईटवर आहे.

www.burrp.com ह्या साईटवर  भारतातील  शहरातील अनेक हॉटेल व रेस्टॉरंटस्ची नावे व त्यांची संपर्क माहिती आहे. ही माहिती आपण ह्याच साईटवरुन कोणालाही मोफत एस.एम.एस. करु शकतो. 

पाककृतीं व पाककला
आता थोडे पाककृतींकडे वळूया. www.khanakhazana.comwww.zeefood.in, www.indobase.com/recipes, www.tajrecipe.com, www.tarladalal.comwww.sanjeevkapoor.comhttp://mydhaba.blogspot.com, www.awesomecuisine.com इत्यादि ह्या सार्‍या साईटस्वर आपल्याला मोफत विविध भारतीय व आंतरराष्ट्रीय पाकविधी व पाककृती (Recipes) शिकता येतात. ह्या साईटस्वर पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य, तो पदार्थ बनवण्यासाठी असणारी पाककृती व अगदी त्या पाककृतीचे व्हीडीओज्‌ सुध्दा उपलब्ध आहेत. त्याशिवाय पाककलांचा सहज शोध घेता येण्यासाठी ह्या साईटस्वर खाद्यपदार्थांचे वर्गीकरण विविध प्रकार, प्रांत, देश, इत्यादि मध्ये केलेले आहे. www.khanakhazana.comwww.tarladalal.com व www.sanjeevkapoor.com ह्या साईटस्वर आपण ह्या साईटच्या प्रशासकांना पाककलेशी संबंधित आपले प्रश्‍नही विचारू शकतो व आपल्याला मिळालेले उत्तर आपल्या बरोबरच इतर लोकही बघू शकतात. www.zeefood.in ही झी टीव्हीची साईट आहे. ह्या साईटवर आपण झी टीव्ही वर प्रसारित झालेल्या पाककलांच्या कार्यक्रमांचे भाग कधीही बघू शकतो. ह्या सर्व साईटस्वर आपण आपल्या पाककलादेखील पाठवू शकतो. जर ह्या साईटस्‌च्या प्रशासकांना आपल्या पाकला आवडल्या तर आपल्या इनामदेखील दिले जाते. www.cookingclasses.co.in ह्या साईटवर विविध पाककलेच्या शिक्षणवर्गांची माहिती आहे.

एकूण इंटरनेटमुळे कुणाचं पोट भरत नाही, या आरोपाला आपण छेद देऊ शकतो. पण याचा अर्थ  आपण आपल्या घरातल्या जेवणाकडे दुर्लक्ष करायचं, असा नक्कीच होत नाही. त्यामुळे इंटरनेटवर बसला की याला जेवणाखाण्याची शुद्ध रहात नाही, या तक्रारीकडे आपण गंभीरपणे पाहायलाच हवं.

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment