latest Post

Virtual School - व्हर्च्युअल शाळा

The below given article of mine has been published in the Dainik Pratyaksha on 1st April 2011. The articles introduces the concept on VIRTUAL SCHOOL to parents and students. The mentioned website has undergone many changes as it has been more than four years since this article was written. But the basics behind the very idea of Virtual School still remain the same which the article attempts to explain. 

The idea of releasing this article from my blog occurred to me after I heard Aniruddha Bapu urging all the parents to learn and cope up with technology. He even urged the young generation, which normal is well acquainted with technology to help their parents, relatives, etc. in this pursuit. 

virtual school, online learning, aniruddha bapu


व्हर्च्युअल शाळा  - http://myschool.in.com

पूर्वी मुलं शाळेत पाटी घेऊन जायची. आजच्या काळात पाटी कालबाह्या झाली आणि त्याची जागा वहीने घेतली. इंग्रजीत वहीला नोटबुक म्हटलं जातं. पण मॉर्डन काळातल्या मुलांना नोटबुकबद्दल विचारलं तर ते आपला लॅपटॉप काढून दाखवतील. कारण त्यालाही आता ‘नोटबुक’च म्हटलं जातं. म्हणजे जशी पाटी कालबाह्य झाली, तशीच वही देखील कालबाह्य  होत जाणार आहे. अशा या बदलत्या काळात, शाळा-कॉलेजातील शिक्षणही आता इंटरनेट आधारित होत चालले आहे.

या काळात केवळ विद्यार्थ्यानाच नव्हे तर पालकांनाही ह्या इंटरनेट व वेबसाइट्स आणि त्याचा शिक्षणात होणारा उपयोग जाणून घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते.  आजच्या ह्या लेखातून आपण अशाच एका साईटबद्दल जाणून घेणार आहोत.

http://myschool.in.com ही साईट म्हणजे एक व्हर्च्युअल शाळाच आहे. ही साईट म्हणजे इंटरनेटवर भरणारी शाळाच. ह्या साईटची अनेक वैशिष्ट्ये आणि वैविध्ये आहेत. त्या कोणत्या व त्याचा आपल्याला कसा उपयोग करता येऊ शकतो, ते आता आपण पाहूया.

ह्या साईटवर शाळा आपल्या प्रोफाईलस् मोफत बनवू शकतात. त्या प्रत्येक प्रोफाईलला एक युनिक ओळख क्रमांक दिला जातो. ह्या ओळख क्रमांकाचा उपयोग करुन त्या शाळेचा कोणता ही विद्यार्थी आपले स्वत:चे खाते या साईटवर मोफत उघडू शकतो. विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी व पालकांसाठीही या साईटवर वेगळी खाती (accounts) असतात. फेसबुक सारखेच या साईटवरही प्रोफाईलमध्ये आपला फोटो लावता (upload) येतो.

हे सर्व खातेदार एकमेकांना पोस्टिंग्स् (messages) पाठवू शकतात. ह्या फिचरचा मुख्य उपयोग म्हणजे मुलांना एकमेकांशी व शिक्षकांशी त्याशिवाय पालकांना शिक्षकांशी थेट संवाद साधता येतो. त्याशिवाय विद्यार्थी व पालक, शिक्षकांशी ‘लाईव्ह चॅट’ देखील करु शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाशी संबंधित कोणती शंका असली तर ती, शिक्षकांना थेट विचारता येते. अनेक वेळेस विद्यार्थ्यांना शिक्षकांना सगळ्या वर्गाच्या समोर आपली शंका विचारायला भिती वाटते. म्हणूनच ह्या थेट चॅट फिचरचा उपयोग अशा विद्यार्थ्यांना नक्कीच होऊ शकतो. या साईटवरील प्रत्येक खातेधारकाला इतरांशी संपर्क साधण्यासाठी एक ईमेल अकाऊंट  दिला जातो. त्याशिवाय ह्या साईटवरुन पालकांना आपल्या पाल्याची शाळेतील उपस्थितिसुद्धा ऑनलाईन कळू शकते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना किंवा पालकांना शिक्षकांना सुट्टी-पत्र सुद्धा ह्या साईटद्वारे ऑनलाईन पाठवता येते.

गृहपाठ किंवा होमवर्क (assignments) म्हटले की सर्वच मुलांना कंटाळा असतो. अनेक वेळेस ते मुद्दामहून गृहपाठ करत नाहीत व कधी खेळाच्या नादात ते गृहपाठ करायला विसरतात. म्हणूनच ह्या साईटवर गृहपाठात करण्यासाठीचे प्रश्‍न शिक्षक अपलोड करु शकतात. हे प्रश्‍न एकाच वेळेस विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना ईमेलद्वारे कळवले जातात. त्यामुळे मुले जरी आपला गृहपाठ करायला विसरली तरी त्यांच्या पालकांना ही त्याची सूचना जात असल्या कारणाने मुलांच्या गृहपाठाकडे दुर्लक्ष होत नाही.

आत्तापर्यंत शाळेत लागणार्‍या सूचना या फक्त शाळेच्या सूचना-फलकावरच वाचता यायच्या. पण ह्या साईटवर शाळेच्या सूचना व बातम्या विद्यार्थ्यांना व पालकांनाही ऑनलाईन पाठविल्या जातात. तसेच परीक्षेची समय-सारणी (Time Table) पाहण्यासाठी पूर्वी विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेच्या सूचना-फलकावरच अवलंबून रहावे लागायचे. पण ह्या साईटचा उपयोग करुन शिक्षक परीक्षेचे वेळापत्रक एकाच वेळेस विद्यार्थी व पालकांना ऑनलाईन दिसेल असे अपलोड करु शकतात.

त्याशिवाय ही साईट स्वत: प्रत्येक वर्गाप्रमाणे व शाळेप्रमाणे विद्यार्थ्यांना त्याच्या एकंदरित प्रर्दशनावर क्रमांक देते. ह्या साईटनी दिलेल्या रँकिंग ज्या व्यतिरीक्त शिक्षक विद्यार्थ्यांचे मासिक, त्रैमासिक, इत्यादि रिपोर्टस् ह्या साईटवर अपलोड करू शकतात. त्याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याचे गुणपत्रक सुद्धा शिक्षक अपलोड करून त्या विद्यार्थ्याला व त्याच्या पालकांना पाठवू शकतात.

ही साईट ट्विटरशी जोडली (integrate)  गेली आहे. त्यामुळे आपले ट्विटस् या साईटवर दिसू शकतात. त्याशिवाय ह्या साईटवर विविध प्रश्‍नांवर मतदान (opinion polls) करता येते. मुलांच्या मनोरंजनासाठी या साईटवर त्यांना ऑनलाईन खेळ (games) ही खेळता येतात. या साईटवर मुलांसाठी चांगले शैक्षणिक व्हिडिओज् देखील  पाहता येतात. विद्यार्थी या साईटवर आपल्या प्रोफाईलच्या माध्यमाने व्हिडिओज् व चांगली माहिती, निबंध, कविता, इत्यादि अपलोड व शेअर करु शकतात. शिक्षकही ह्या साईटवर आपल्या व्याख्यानांचे व्हिडिओज् (tutorials) अपलोड करु शकतात. हे व्हिडियोज् सर्व विद्यार्थी त्यांच्या सोईप्रमाणे पाहू शकतात. व्याख्यानांच्या व्यतिरीक्त शिक्षक आपल्या नोट्सही अपलोड करु शकतात. या साईटवर शाळेच्या सामग्रीच्या व्यावसायात असणार्‍या कंपन्या त्यांच्या जाहिराती देऊन आपली प्रसिद्धी करु शकतात.


हल्ली सगळ्या गोष्टीं आपल्याला ‘होम डिलिव्हरी’ने मिळतात. त्याशिवाय आपल्याला जी कार्य ऑनलाईन व व्हर्च्युअली करता येतात (उदा: इंटरनेट बँकिंग) ती जास्त सोईस्कर वाटतात. अशा काळात ‘माय स्कूल’ सारख्या इंटरनेटवर भरणार्‍या  शाळेचं महत्त्व न वाढलं तरच नवलं. प्रत्येकाच्या कामाचे आणि प्रवासाचे  तास वाढत चालले आहे. सहाजिकच मुलांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे, शैक्षणिक प्रगतीकडे पालकांचं दुर्लक्ष होऊ शकतं. अशा वेळी ‘माय स्कूल’ सारख्या संकेतस्थाळाची आपण नक्कीच मदत घेऊ शकतो. मुलांनाही यामुळे आपल्याला अडलेल्या गोष्टी विचारण्यासाठी, शंकांचे  समाधान करण्यासाठी आकर्षक पर्याय मिळतो. यामुळे गृहपाठाचा कंटाळा करणारी मुलं अधिक उत्सुकतेने गृहपाठ  आणि अभ्यास करू लागतील. विचारलेल्या प्रश्‍नांचं उत्तरं मिळाल्यानंतर  त्यांना नवे प्रश्‍न विचारण्याची, सवय लागेल. ती शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असते.

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment