latest Post

फुकट कॉल ऑफिस - Free Calling Apps

This article has been published in Dainik Pratyaksha on 8th April 2011. The article talks about various freewares and sites available that offer us free calling, SMSing and chatting. As the article dates back to year 2011, the mentioned sites have undergone many advancements. Moreover recently with the advent of IM or Instant Messaging apps like Whatsapp, Telegram and Hike, SMS has taken a back seat. Let us begin...



free calling app - Nimbuzz

ला परवा अगदी तातडीने घरी फोन करायचा होता. पण माझा फोनमधला बॅलन्स संपला होता. पण जो जी.पी.आर.एस. चा ऑफर-पॅक मी घेतला होता तो शिल्लक होता. जी.पी.आर.एस. चा उपयोग करून दूरध्वनी (Phone call) करता येतो तोही मोफत ह्याची कल्पना मला होती. पण कधी त्याचा उपयोग केला नव्हता. पण म्हणतात ना, ‘आवश्यकता ही आविष्काराची जननी असते त्याचप्रमाणे निंबझ’ - Nimbuzz या मागे कधी तरी डाऊनलोड केलेल्या ऍप्लिकेशनचा उपयोग करायचं ठरवलं. निंबझवरून आपल्याला, आपल्या मोबाईलसाठी त्यांचे एक ऍप्लिकेशन मोफत डाऊनलोड करता येते आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या ऍपच्या उपयोगाने आपल्याला अगदी मोफत फोनकॉलस् करता येतात. हे फोनकॉलस् मोबाईल-ते-मोबाईल, मोबाईल-ते-संगणक, संगणक-ते-संगणक संगणक-ते-मोबाईल अशा प्रकारे करता येतात. ते कसे ते बघू या.

हल्ली प्रत्येक सामान्य मध्यमवर्गीय माणसाचा साधारण दरमहा मोबाईलच्या बिलावर ८००-१००० रुपये तरी खर्च होतोच. हा खर्च कमी करण्यासाठी आपल्याला निंबझचा चांगलाच उपयोग होऊ शकतो. ह्या साईटचा उपयोग करून आपण एकमेकांना मोफत कॉल करू शकतोनिंबझ हे ऍप जगातील जवळ-जवळ ५०० मोबाईल हॅण्डसेट, सींबियन, आय-फोन, आय-पॅड, ऍड्रॉईड, ब्लॅकबेरी, जेएमई विंडोज्, मॉक डेस्कटॉपस्, इत्यादिंवर व्यवस्थित चालते.

निंबझची स्थापना डच मोबाईल तंत्रज्ञानातील तज्ञ एव्हर्ट लट मार्टिन स्मिंक यांनी केली. या साईटला आत्ता पर्यंत टेकक्रंच युरोचे बेस्ट मोबाईल स्टार्टअप २००९, रेड हेरिंग पुरस्कार, मोबाईल न्यूज पुरस्कार २००९  इत्यादि सन्मान मिळाले आहेत

free calling app - Nimbuzz
निंबझ मोफत वापरून आपण कोणत्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो?
निंबझ हे ऍप्लिकेशन www.nimbuzz.com निंबझमध्ये आपण आपला जीमेलचा, फेसबुक, याहू, ट्विटर, इत्यादिचा लॉगीन आय.डी. वापरून लॉगीन करू शकतो. एकदा का लॉगीन केले की आपल्याला आपला जीमेलचा, फेसबुक किंवा ट्विटरच्याच लॉगीन आयडीने आपल्या त्या अकाऊंटमधील सर्व संपर्क सूची (contact list) निंबझमधूनच चॅट करता येते. काही विशिष्ठ संपर्कांशी एकत्र बोलण्यासाठी आपण निंबझमध्ये खाजगी चॅट रुमस्ही बनवू शकतो. शिवाय निंबझ वापरूनच आपण मोफत एस.एम.एस. सुद्धा करू शकतो.

आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोफत फोनकॉल करायची सुविधा. त्यासाठी आपल्याला ज्याला आपण कॉल करणार आहोत त्याच्या मोबाईलवर निंबझ इन्स्टॉलड जी.पी.आर.एस. असावे लागते. निंबझ ते निंबझच्या व्यतिरिक्त आपल्याला निंबझवरून गुगल टॉकवर ही कॉल करता येतो पण ही सुविधा मोफत उपलब्ध नाही. आपल्या निंबझ खात्यामधून आपण आपल्या इतर कॉन्टॅक्ट्स इमेलवरून आमंत्रण पाठवून त्यांच्याशी जोडून घेऊ शकतो. एकदा का जोडले गेलो की मग हव्या तेवढ्या गप्पा मारायला आपण मोकळे. निंबझमध्ये आपल्याला आपल्या सर्व संपर्काची सूची (address book) ही उपलब्ध असते.

मोफत कॉलचे इतर पर्याय 
निंबझ सारखेच आपण गुगल टॉकचा www.google.com/talk वापर करून ही मोफत कॉलिंग करू शकतो. हल्ली गुगल टॉक हे जीमेल मध्येच एकत्रित उपलब्ध होत असल्यामुळे आपण www.gmail.com चा ही उपयोग करू शकतो. गुगल टॉकचा मोफत वापर करण्यासाठी आपल्याकडे ज्याला आपल्याला कॉल करायचा आहे त्याच्याकडे गुगल टॉक इन्स्टॉल्ड असावे लागते. त्याशिवाय हेडफोन ध्वनिविस्तारक (mike) असणे ही गरजेचे असते. या सुविधा असल्या की आपण आपल्या संगणकावरुन इतर कोणाशीही मोफत बोलू शकतो अगदी कोणत्याही एका देशातून कोणत्याही दुसर्या देशातसुध्दा. पण संभाषण साधताना दोन्ही व्यक्ती गुगल टॉकवर ऑनलाईन असणे हे स्वाभाविकच आले

जर आपण ऑफलाईन असताना आपल्याशी कोण संपर्क साधू इच्छीत असेल तर तसे सूतोवाच करण्याची सोय निंबझमध्ये आहे. त्याशिवाय निंबझचा उपयोग करून आपण एकमेकांशी फाईलस्‌ची देखील देवाण-घेवाण करू शकता. निंबझचे आत्तापर्यंत जगात ,००,००० उपभोक्ते आहेत या साईटच्या व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार त्यांची संख्या दिवसागणिक १०,००० नी वाढत आहे.

मोफत एस.एम.एस.चे इतर पर्याय 
निंबझ सारखेच आपण www.160by2.com, www.way2sms.com, www.fullonsms.com, www.smsgupshup.com ह्या अशा अनेक साईटस्चा उपयोग करुन आपण मोफत एस.एम.एस. पाठवू शकतो. ह्यासाठी आपल्याला या साईटस्वर आपली नोंदणी (registration) करावे लागते. त्यानंतर आपण भारतातील कोणत्याही नंबरवर  मोफत एस.एम.एस. पाठवू शकतो. हे एस.एम.एस. एकाच वेळेस एकाला किंवा अनेकांना (Bulk SMS) पाठवू शकतो. त्याशिवाय आपल्याला ह्या साईटवर आपल्या संपर्कातील विशिष्ट ग्रुपस् बनवता येतात. त्यामुळे एस.एम.एस. पाठवायच्या वेळेस पुन्हा-पुन्हा आपल्याला ह्या लोकांचे मोबाईल नंबर टाईप करत बसावे लागत नाहीत. साधारणत: या साईट्स आपण पाठवणार असणार्‍या एस.एम.एस. वर १६० अक्षरांचे बंधन घालतात.

मोफत चॅटिंगचे इतर पर्याय 
मोफत चॅटिंग ह्या विषयावर तर तरुण पिढीला कसल्याही मार्गदर्शनाची गरज नाहीwww.facebook.com, www.gmail.com, http://mail.yahoo.com या अशा अनेक साईटस्‌चा उपयोग करून आपण ऑनलाईन मोफत लाईव्ह चॅटिंग करू शकतो. ह्याच चॅटचा उपयोग करून आपण अत्यंत जड फाईल्स्‌ची देवाण-घेवाणदेखील करू शकतो.

सध्याच्या काटकसरीच्या (cost-cutting and optimization)  फ़्रीवेअरच्या जगात प्रत्येक व्यक्ती कंपनी आपला खर्च कसा कमीत-कमी होईल आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांचाच जास्तीत-जास्त उपयोग कसा करता येईल त्याकडे कटाक्षाने लक्ष देत आहे. त्यामुळे जर कोणी आपल्याला, आपल्याबरोबर सतत असणार्‍या, अगदी उशापासून ते ऑफिसपर्यंत असणार्‍या त्या वस्तूचा म्हणजेच मोबाईलवर बोलण्याचा खर्च कमी करून देत असेल तर ते सगळ्यांना नक्की आवडेल. म्हणूनच आपण ह्या तंत्रज्ञानाला फुकट-कॉल-ऑफिस  (पी.सी..) म्हणू शकतो.

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

1 comments:

  1. A very helpful post! We who stay outside India depend on such applications to cut down our phone bills. However, most of these applications require the same app at the other end too. But there are some application which help you in calling mobiles as well as landlines without requiring the same app other side.

    Thanks for the useful post.

    Sandeep Mahajan

    ReplyDelete