latest Post

उद्योग-व्यापाराची संकेतस्थळे


Today being Saturday and as promised I am publishing fourth article of my series in daily Pratyaksha that is on the business portals. This article was published on 10th December 2010.

We are going to see www.indiamart.com and www.justdial.com that are one of the leading online portals' for having an online presence of our business. Read the full article as under:





उद्योग-व्यापाराची संकेतस्थळे


मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बरॅक ओबामा भारताच्या दौर्‍यावर आले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांची भारतभेट नुकतीच संपली. चीनचे पंतप्रधान वेन जिअबाओ लवकरच भारतभेटीवर येणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदव्हेदेव्ह देखील डिसेंबर महिन्यात भारताचा दौरा करतील.

जगातल्याया प्रमुख देशांच्या राष्ट्रप्रमुखांच भारत हे पर्यटन स्थळ बनतय की काय, असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. पण भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरु असताना या राष्ट्रप्रमुखांना भारतात येणं भाग पडत आहे. भारताचा विकास जगाच्या आकर्षणाचा विषय बनलेला असतानाच, शक्यतितका भारताच्या प्रगतीचा आपण ही फायदा करुन घ्यावा, यासाठी मोठ्या देशांमध्ये स्पर्धा सुरु आहे. म्हणूनच आपण भारतीयांनीही आपल्या देशाच्या प्रगतीचा पुरेपूर लाभ करुन घ्यायला हवा. या कामी मागे राहता उपयोग नाही.

साधारणपणे बिझनेस किंवा उद्योग वगैरे हे शब्द कानावर पडले की आपल्यासमोर हजातो कोटींचे प्रकल्प किंवा बड्या कंपन्या उभ्या राहतात. पण आपल्या देशात लघुउद्योग किंवा छोट्या छोट्या उद्योगांचीही संख्या लक्षणीय आहे. असे छोटे उद्योग आपल्या अर्थव्यवस्थेला मोठे योगदान देत असतात. या उद्योगांना चालना मिळण्यासाठी इंटरनेट हे माध्यम अतिशय उपयुक्त ठरू शकतं. कसं, ते आपण काही व्यापाराभिमुख संकेतस्थळांचा (Business Portals) आढावा घेऊन पाहू शकतो.

ही अशीच काही व्यापाराभिमुख संकेतस्थळे पण, आपण आज खास अभ्यासणार आहोत ते www.indiamart.com www.justdial.com  ही दोन संकेतस्थळे. या संकेतस्थळांचा उत्पादक, वितरक व ग्राहक हे सर्वच फायदा घेऊ शकतात.

कोणती एक व्यक्ति असो की छोटे किंवा मोठे उद्योग असोत, आज ह्या एकविसाव्या शतकात इंटरनेटवरील आपली व्हर्चुअल ओळख (identity) सकारात्मकरित्या अख्ख्या जगा समोर मांडण्याचे व त्यातून फायदा मिळविण्याचे अत्यंत उपयोगी साधन झाले आहे. त्यासाठीच संकेतस्थळांचा उपयोग केला जातो. पण एक व्यावसायिक संकेतस्थळ असणे हे सगळ्याच उद्योजकांना परवडण्याजोगे नाही. येथे ह्या उद्योजकांना इंडियामार्ट या संकेतस्थळाचा उपयोग करता येऊ शकतो. इंडियामार्ट वर कोणीही व्यक्त्ति, संस्था अथवा उद्योग आपल्या सेवांची / उत्पादनांची यादी, भाव, प्रकार, इत्यादी प्रकाशित करुन त्यांच्याबद्दल तपशीलही देऊ शकतात. त्या शिवाय आपला उद्योग, कंपनीबद्दलची माहिती, आपला संर्पक क्रमांक व पत्ता, आपल्या उद्योगाच्या, सेवांची, उत्पादनांची खासीयत, इत्यादी बाबींचा उल्लेख एका संकेतस्थळ सदृश्य वेब पेज बनवून त्यावर करता येतो व ते ही कोणत्याही तंत्रज्ञाच्या मदती शिवाय. सर्वात मुख्य म्हणजे हे सर्व फायदे आपल्याला अगदी मोफत घेता येतात. त्याशिवाया इंडियामार्ट अगदी वाजवी किंमतीत आपल्याला आपले स्वत:चे संकेतस्थळही विकसित करुन देते ज्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या प्रतिनिधींशी संर्पक साधावा लागतो. ह्या वेब पेज / संकेतस्थळ बनविण्याच्या प्रक्रियेत जर आपण आपल्या व्यवसायाशी निगडीत विशिष्ट शब्दांचा (Key Words) अचूक उपयोग केला तर ग्राहकांच्या या संकेतस्थळावरील शोधामध्ये (Search) आपल्या कंपनीची, सेवांची, उत्पादनांची माहिती त्या ग्राहकाला लगेच मिळू शकते व त्याचबरोबर त्याच वेबपेजवर आपल्या कंपनीच्या संर्पकाची माहितीही असल्यामुळे हा भावी ग्राहक आपल्याला संर्पक करण्याची शक्यता निर्माण होऊन त्याला आपल्याला मिळवता येऊ शकतात. ग्राहक म्हणून आपण ह्याच्या संकेतस्थळावर विशिष्ट शब्द वापरुन (Filters) आपल्याला हव्या असणार्‍या सेवेबद्दल किंवा उत्पादनाबद्दल, आपल्याला हव्या असणार्‍या विभागातील (Area) उत्पादक / वितरकांची यादी प्राप्त करुन घेऊ शकतो.

या संकेतस्थळावर आपल्याला जरी आपले अगदी संकेतस्थळ सदृश्य वेबपेज बनवता येत नसले तरी आपल्या उद्योग, कंपनीबद्दलची माहिती, आपला संर्पक क्रमांक व पत्ता, आपल्या उद्योगाच्या, सेवांची, उत्पादनांची खासियत, इत्यादी बाबींचा उल्लेख असणारे वेबपेज आपल्याला येथे मोफत तयार करता येतो. त्याशिवाय जस्ट-डायलची आपली स्वत:ची कॉल सेंटरस् भारताच्या सर्व प्रमुख शहरांमध्ये आहेत. येथे दूरध्वनी करुन आपण आपल्याला हव्या असणार्‍या कोणत्याही सेवेबद्दल किंवा उत्पादनाबद्दल विचारणा करु शकतो. त्याचबरोबर त्यांच्या संकेतस्थळावरही ही सर्व माहिती उपलब्ध असतेच. ग्राहक म्हणून आपण ह्या संकेतस्थळावर विशिष्ठ शब्द वापरुन (Filters Keywords) आपल्याला हव्या असणार्‍या सेवेबद्दल किंवा उत्पादनाबद्दल, आपल्याला हव्या असणार्‍या विभागातील (Area) उत्पादक / वितरकांची यादी प्राप्त करुन घेऊ शकतो.

आता ग्राहक म्हणून केलेला आपला दूरध्वनी किंवा संकेतस्थळावर केलेला शोध ह्या मुळे जस्ट-डायलकडे आपल्याला काय हवे आहे त्याची माहिती असते. त्याच वेळेला जस्ट-डायल कडे त्या सेवा / उत्पादने पुरविणार्‍या, आपल्याला हव्या असणार्‍या विभागातील उत्पादक / वितरकांची यादी ही असते. उदा: माझा संगणक खराब झाला आहे त्यामुळे मला तो दुरुस्त करुन घ्यावा लागणार आहे. आता समजा मी मुंबईमध्ये खार (पश्‍चिम) येथे राहतो, तर मी ज्या वेळेस ह्या संकेतस्थळाचा वापर करेन त्यावेळेस मी संगणक यंत्रज्ञ (मेकॅनिक), मुंबई व खार (पश्‍चिम) ह्या विशिष्ठ शब्दांचा (Keywords) उपयोग केला की माझा समोरिल स्क्रिनवर मुंबईतील खार (पश्‍चिम) विभागात असणार्‍या व जस्ट-डायलवर नोंद असणार्‍या सर्व संगणक यंत्रज्ञांची (मेकॅनिकस्) यादी प्रकाशित होईल. त्यावरुन मी स्वत:च त्यांना संर्पक करु शकतो किंवा जस्ट-डायलकडून त्यांना माझा संर्पक क्रमांक मिळाला असल्यामुळे मी जस्ट-डायलला दूरध्वनी केल्याच्या काही क्षणातच त्या सर्व संगणक यंत्रज्ञांचे (मेकॅनिकस्) दूरध्वनी मला येऊ लागतात.

ह्या अशा लिडस् जस्ट-डायल त्या उत्पादक / वितरकांना विकते. या लिडस्‌चा सहा महिने किंवा त्याहून कमी कालावधी चे प्रस्ताव (ऑफरस्) असतात जे उत्पादक / वितरक विकत घेऊ शकतात. ह्या प्रस्तावांमध्ये उत्पादक / वितरकांनी जस्ट-डायल बरोबर ठरविलेल्या भावाला लिडस्‌ची विशिष्ठ संख्या दिली जाते. ह्यामुळेच ग्राहकालाही जे हवे ते वेळेत मिळते व उत्पादक / वितरकांनाही त्यांचा धंदा वाढविण्याची संधी मिळते. पण या लिडस्चा भाव मात्र प्रत्येकासाठी वेगळा असतो व जो सर्वात जास्त किंमत देईल त्याला सर्वात पहिल्यांदा लिड पुरवली जाते व त्याच्या वेब पेजला ही सर्व शोधांच्या यादीत (search results and associated listing) पहिले स्थान दिले जाते. जस्ट-डायलने सध्या त्यांच्या कॉल सेंटरस् वर एक नवीन सुविधाही सुरु केली आहे ज्याच्या मध्ये आपण त्यांना महिती विचारण्यासाठी केलेला दूरध्वनीच ते थेट आपल्याला हव्या असणार्‍या विभागातील उत्पादक / वितरकांना लावून देऊ शकतात.

माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या कौशल्याने केला तर आपला उद्योग अधिक वेगाने प्रगती करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे फार मोठे भांडवल असण्याचीही आवश्यकता उरलेली नाही फक्त बदलत्या जगाच्या गरजा पुरविण्याची क्षमता आपल्याकडे असणे आणि त्या आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, हीच आजच्या काळातील सर्वात मोठी बाब ठरते. अशा परिस्थितीवर दिलेल्या बिझनेस पोर्टल्स्‌चं महत्त्व अतिशय वाढलं आहे. त्याचा अचूकपणे वापर करणारे अल्पावधित आपल्या व्यवसायाची घोडदौड सुरू करु शकतात, अगदी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थे सारखी.

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment