I am publishing third article of my series in daily Pratyaksha that was published on the www.compareindia.in.com. This article was published on 3rd December 2010. Compareindia is one of the leading online portal's for purchase of many things from mobiles to computers, computer accessories to home appliances, electronic gadgets to automotives, lifestyle products and many more. Read the full article as under:
ग्राहकराजाचा दरबार www.compareindia.in.com
- मिहिर नगरकर
दुकानात गेलो. एकच
भाव आणि पर्याय नसलेली वस्तु खरेदी केली आणि बाहेर आलो. असली खरेदी तुम्हाला आवडेल
का? अजिबात नाही. खरेदीला बाहेर पडल्यानंतर आपली नजर शोधत असते ते
सर्वोत्तम पर्याय आणि सर्वोत्तम किंमत. त्यासाठी दहा दुकानं आणि ठिकाणं फिरण्याचे
कष्ट उपसायला आपल्याला काही वाटन नाही. एवढं सगळं करुन आपल्या मनाजोगती वस्तू माफक
दरात मिळाली की ते समाधान आहाहाहा!
Image published in dainik Pratyaksha |
हाकी इंटरनेटवरील
संकेतस्थळे अर्थात वेबसाईटस् हे दहा दुकानं व ठिकाणं फिरण्याचे कष्ट वाचवू शकतात.
आजच्या धावपळीच्या काळात त्याची मोठी गरज देखील आहे. तेव्हा अनेक पर्याय एकाच वेळी
पाहण्यासाठी त्यांची सखोल माहिती मिळविण्यासाठी आता लॉगीन कराच. आजच्या या लेखात आपण
त्याचीच माहिती घेणार आहोत.
www.compareindia.in.com हे अनेक प्रॉडक्टची माहिती देणारं आणि त्याची तुलना करणारं महत्त्वाचं
संकेतस्थळ. ह्या संकेतस्थळाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे संकेतस्थळ वापरुन,
उत्पादनांची तुलना केल्या नंतर, ह्या संकेतस्थळावरुन
आपल्याला एक रिसीट मिळते. ती दाखवली की संकेतस्थळाशी संलग्न असणार्या वितरक दुकानात
दिल्यावर त्याच्यावर आपल्याला घसघशीत म्हणजे २% ते ३५% सूट मिळते. त्यासाठी या संकेतस्थळाची
सदस्यता स्विकारण्याचीही गरज नाही. ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाइल्स, संगणक, घरगूती उपकरणे,
एक्सेसरीज, यांचा समावेश आहे.
आता या compareindia बद्दल देखील अधिक माहिती घेऊ. हे नेटवर्क१८ (Network18) या भारतातील अग्रगण्य मीडिया समूहाच्या मालकीचे संकेतस्थळ आहे. प्रख्यात टी.
व्ही. चॅनल सीएनबीसी१८ आणि सीएनबीसी आवाज ही ह्या नेटवर्क१८ समूहाच्याच मालकीच्याच
वाहिन्या आहेत. त्याशिवाय इंटरनेटवर आधारित माहिती आणि व्यवहार सेवा पूरवणारी वेब१८
ही कंपनी ही नेटवर्क१८च्याच मालकीची आहे.
या संकेतस्थळावर उत्पादनाची
तुलना करताना आपल्याला सर्वप्रथम उत्पादनांची श्रेणी निवडावी लागते. त्यानंतर तुलना
करण्यासाठी आपल्याला चार पर्याय दिले जातात
१) ब्रॅडं आणि कंपनीचे
नाव
२) आपलं बजेट
३) त्या उत्पादनात
हवे असलेले फिचर्स
४) हवे असतील तर अधिक
काही फिचर्स.
ह्यातील कोणत्याही
एका किंवा चारही पर्यायांची आपण जसजशी निवड करत जातो तस-तसे त्याच पानावर खाली योग्य
ती उत्पादने डॅशबोर्डच्या पध्दतेने त्यांची छायाचित्रे, या
संकेतस्थळावरची त्याची किंमत व बाजारभावासहित प्रर्दशित केली जाते उदा. जर आपण संगणकाच्या
दोन किंवा तीन ब्रॅड्सची तुलना करत असू तर त्या संगणकांच्या सर्व गुणधर्मांची पूर्ण
यादी उदा. रॅंम, हार्ड डिस्क, वीडियो कार्ड,
सुरक्षा, ऑपरेटिंग सिस्टम, बँटरी, विक्री पश्चात सेवा, इत्यादी
आपल्या समोर डॅशबोर्ड पद्धतीने प्रर्दशित होते. त्यानंतर त्या उत्पादनाच्या छायाचित्रांवर
क्लिक केले की आपल्याला त्या उत्पादनाच्या गुणधर्मांची पूर्ण यादी व इथ्यंभूत माहिती
मिळते. ह्याच पानावर आपल्याला त्या उत्पादन विकणार्या मूळ कंपनीची माहिती ही मिळू
शकते. तसचं आपल्याला त्या उत्पादनाबद्दल इतर ग्राहकांनी नोंदवलेली त्यांची मते ही वाचता
येतात. या खेरीज आपल्याला त्या उत्पादनाची आपल्या राज्यातील व आपल्या शहरातील वितरकांबद्दल माहिती (पत्ता, दूरध्वनी क्रमांक,
संपर्कयोग्य माणसाचे नाव, इत्यादी) मिळते.
त्यानंतर आपल्याला
एक रिसीट मिळते. तिची प्रिंट घेऊन आपण त्या वितरकाकडे गेलो की तो वितरक आपल्याला डिस्काऊंट
देतो. ह्याचाच अर्थ असा की ह्या संकेतस्थळावर पेमेंटगेटवे नाही म्हणजेच ऑनलाईन भुगतान
(पेमेंट) ची सोय उपलब्ध नाही. पण तरीही ग्राहक म्हणून आपल्याला काही बाबींची नोंद घेतली
पाहिजे ती म्हणजे
१) हा डिस्काऊंट फक्त
रोकड व्यवहारांवरच मिळतो. क्रेडिट कार्ड वर जर आपण खरेदी केली तर कदचित किमतीत फरक
पडू शकतो. वाहतूकीचा खर्च अतिरीक्त भरावा लागतो.
ह्या गोष्ट ध्यानात
घेतल्या, की या साईटमार्फत खरेदी करणं सोपं आणि किफायतशीर ठरतं. आपल्याला
हव्या असलेल्या वस्तू आणि उपकरणांची लाबलचक यादी यावर मिळते आणि त्याची तुलना करण्याची
संधी देखील. त्याचवेळी साईटवर सूचीबध्द केलेल्या उत्पादनांना वापरायच्या मार्गदर्शन
पुस्तीका संकेतस्थळावर आपण काणत्या उत्पादनांची
तुलना व खरेदी करु शकतो ?
अगोदर म्हटल्या प्रमाणे
ह्या संकेतस्थळावर एकूण ७ श्रेणींतील उत्पादने आपल्याला खरेदी करता येतात. ह्या मध्ये
इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल (भ्रमणध्वनी), संगणक, गाड्या, घरगूती उपकरणे (Home Appliances), जीवन-शैली उपकरणे (Lifestyle Appliances), एक्सेसरीज़,
इत्यादी मोडतात. (प्रॉडक्ट युसेज गाईडस्) व मार्गदर्शक ध्वनिफिती(वीडियोस्)
ही उपलब्ध आहेत. आपण या संकेतस्थळाच्या कॉलसेंटरला एस.एम.एस. (एस.एम.एस. वर शुल्क लागते,
हा टोल-फ्री क्रमांक नाही)पाठवल्यावर आपल्याला या संकेतस्थळावरील नवीन
उत्पादनांच्या अनावरणांबद्दल व कमी झालेल्या भावांबद्दल सूचना एस.एम.एस. द्वारेच मिळतात.
त्याशिवाय फक्त आपले नाव व ईमेल आय.डी. या संकेतस्थळा दिले की आपल्याला त्यांच्या कडून
नियमित मोफत समाचारपत्र (न्यूजलेटर्स) पाठवले जातात. ज्यामध्ये या संकेतस्थळावरील नव्या उत्पादनांच्या झालेल्या व लवकरच होणार्या
अनावरणांबद्दल, कमी झालेल्या भावांबद्दल, इत्यादी सूचना व माहिती असते. त्याशिवाय ही महिती या संकेतस्थळाच्या मुख पृष्ठावर
(होम पेजवर) ही उपलब्ध असते. या संकेतस्थळावर आपल्याला विविध ग्राहक उपयोगी विषयांवर
मतदान करता येते व इतरांची मते जाणताही येतात.
www.compareindia.in.com ह्या संकेतस्थळासारखेच www.tolmol.com हे ही एक उत्पादनांची खरेदीतूल्य तुलना करण्याचे उपयुक्त संकेतस्थळ आहे. त्याच
बरोबर www.naaptol.com हे ही एक अत्यंत उपयुक्त संकेतस्थळ
आहे. पण हे स्थळ वापरण्यांसाठी आपल्याला त्याची सदस्यता घ्यावी लागते जी मोफत आहे.
आताच्या काळात ग्राहकाचा
उल्लेख ग्राहकराजा असा केला जातो. ह्या राजाचा दरबार आता इंटरनेटवर भरविला जाऊ लागलाय.
त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर या साईटस्ना नक्की भेट द्या. पण खरेदी करताना अगदी राजासारखाच
सूज्ञ व सम्योचित निर्णय घ्या म्हणजे झालं.
To trade in stock market patient and greeds are a more important factor. Along with this two-factor Indian share broker selection is also very important for smooth trading.
ReplyDelete