I was extremely fortunate the attend a seminar on 'Online Learning' which was brainchild of and moderated by Sadguru Bapu. During the seminar, He stressed on the importance of we adopting to online education system and benefits of it. He made a very specific reference to few sites out of which http://nptel.iitm.ac.in was one of them. NPTEL provides us with extremely informative video tutorials of professors from IITs. The tutorials are from various branches of education viz., management, engineering, etc.
In line with this I am publishing my fifth article of my series in daily Pratyaksha that was on the free educational sites and portals. This article was published on 17th December 2010. We are going to see www.excellup.com, http://mycbseguide.com, www.minglebox.com and http://nptel.iitm.ac.in. These are some of the best online educational sites. Read the full article as under:
शैक्षणिक संकेतस्थळे
काही दशकांपूर्वी मुले शाळेला पाट्या घेऊन जात असत. त्यावेळेस शिक्षक जे शिकवायचे
ते मुलांना पाट्यांवरच लिहून घ्यावं लागायच कारण त्यावेळेस वह्या व पुस्तके मिळत ही
नसत व सामान्यांना परवडण्याजोगीही नसत. त्यानंतर वह्या व पुस्तकांचा जमाना आला व पाट्या कालबाह्य झाल्या. वहीला इंग्रजी
मध्ये ’नोटबूक’ म्हणतात हे तर आपल्याला माहित आहेच. पूर्वी मुलं ज्या वयात वह्या वापरायची
त्या वयातील आत्ताच्या शाळकरी मुलांना जर आपण नोटबूकबद्दल विचारलत तर ते नक्कीच समजतील की तुम्ही त्यांना लॅपटॉपबद्दल
विचारत आहात, कारण छोट्या लॅपटॉपला नोटबूक म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे अशा या जमान्यात
ज्यात शाळा-कॉलेजातील शिक्षणही आता इंटरनेटआधारित होत चालले आहे, आपल्याला म्हणजेच
फक्त सर्व विद्यार्थ्यानाच नव्हे तर पालकांनाही ह्या इंटरनेट व त्यावरील संकेतस्थळे
(वेबसाइटस्) आणि त्याचा शिक्षणात होणारा उपयोग जाणून घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब
ठरते व आजच्या ह्या लेखातून आपण हेच जाणून घेणार आहोत.
http://mycbseguide.com, www.excellup.com, www.minglebox.com, http://nptel.iitm.ac.in, ह्या अशाच काही वेबसाइटस् ज्या
आपल्याला ’मोफत’ वापरायला मिळतात. ह्या विविध साइटस्चा उपयोग सी.बी.एस.ई. बोर्डाच्या ८वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांना
तसेच, आय.आय.टी-जे.ई.ई., ए.आय.ई.ई.ई., बी.आय.टी.एस.ए.टी. (बिटसॅट), सी.ई.टी.-के, ई.ए.एम.सी.ई.टी.,
एम.टी.-सी.ई.टी., गेट, वि.ई.टी.ई.ई.ई. या अभियांत्रिकी (इंजिनीयरींग) अभ्यासक्रमाच्या
प्रवेश परिक्षांच्या परिक्षार्थीं व एम्स्, ए.आय.पी.एम.टी.,
सी.ई.टी. - के, एम.एच.टी. - सी.ई.टी., गुज-सी.ई.टी. या वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या
प्रवेश परिक्षांच्या परिक्षार्थीं. शिवाय कॅट, झॅट, स्नॅप,
मॅट, महा-सी.ई.टी., इबसॅट, एफ.एम.एस., आय.आय.एफ.टी., एन-मॅट, जे-एम.ई.टी. या व्यवस्थापन
(मॅनेजमेंट) अभ्यासक्रमाच्या परिक्षार्थींना, आणि जी.आर.ई., जी.मॅट, टॉफेल, आय.ई.एल.टी.एस.,
एल.सॅट, या परदेशात शिक्षण घेण्यासाठी असणार्या प्रवेश परिक्षांच्या
परिक्षार्थींना भरपूर फायदा होऊ शकतो. त्याशिवाय भारतीय लोक सेवा आयोग म्हणजेच यु.पी.एस.सी
च्या परीक्षा, उदा: सी.डी.एस., सी.एस.ई., आय.ई.एस., आय.एफ.एस., एन.डी.ए. / एन.ए.) व सर्व
बँकांच्या व सरकारी संस्था व आस्थापनांच्या प्रवेश परीक्षांच्या परिक्षार्थींनाही यातील
काही साईटसचा भरपूर फायदा होऊ शकतो.
सी.बी.एस.ई बोर्डाच्या शिक्षण अभ्यासक्रमासाठी
www.excellup.com व http://mycbseguide.com या साईटस्
सी.बी.एस.ई बोर्डाच्या ८वी ते १२वी च्या विद्यार्थ्याना अत्यंत उपयोगाच्या आहेत. मायसीबीएसई साइट वर दर वर्षीचा ९वी ते १२वी चा प्रत्येक इयत्तेतील, प्रत्येक विषयाचा अधिकृत अभ्यासक्रम (सिलॅबस) अपलोड (प्रकाशित) केलेला असतो.
त्यामुळॆ विद्यार्थ्यांचा काही वेळेस होणारा अभ्यासक्रमाबद्दलचा गोंधळ कमी होण्यास
नक्कीच मदत होते. त्याच बरोबर मायसीबीएसई व एक्सएलअप या साइटस् वर
८वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक इयत्तेतील प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाशी
निगडीत नोट्स उपलब्ध आहेत. त्याशिवाय नियमित गृहपाठासाठी
एक्सएलअप वर असाइनमेंटस् ही उपलब्ध आहेत. मायसीबीएसई वर
महत्त्वाच्या प्रश्नांचा संचयही आहे. आपण जे आपल्या डोळ्यांनी बघतो ते आपल्याला लवकर
लक्षात येते. म्हणूनच एक्सएलअप वर समजण्यासाठी जटील अशा विषयांचे विडियोज् उदाहरणार्थ:
हृदयक्रिया, पाचनप्रणाली, वरनियर कॉलिपर्सचा वापर, प्रकाश संश्लेषण (फोटोसिंथेसीस),
इत्यादीवर उपलब्ध आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मायसीबीएसई व एक्सएलअप या दोन्ही साइट्सवर प्रत्येक इयत्तेतील प्रत्येक
विषयांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे
नमुने व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या उत्तरपत्रिका ही उपलब्ध आहेत
ज्या आपण डाऊनलोड करु शकतो.
शिवाय शाळांशी निगडीत बातम्या, सामान्या ज्ञानाच्या चाचण्या, प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या युक्ती,
परीक्षांचे निकाल, विविध व्यवसायांबद्दल व नोकर्यांबद्दलची
माहिती (करिअरच्या पर्यायांची माहिती) ह्या साइटस् वर आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्याशिवाय
फक्त आपले नाव व ईमेल आय.डी. या संकेतस्थळांना दिले की आपल्याला त्यांच्या कडून नियमित
मोफत समाचारपत्र (न्यूजलेटरस्) पाठविले जाते ज्यामध्ये परीक्षांच्या व दाखल्यांच्या
(ऍडमिशनच्या) आगाऊ सूचना, शिष्यवृत्तींची सूचना व माहिती असते.
अभियांत्रिकी, वैद्यकिय, व्यवस्थापन आणि परदेशी शिक्षण अभ्यासक्रमासाठी
www.minglebox.com ही ह्या सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी सर्वात उपयुक्त साईट आहे. मिंगलबॉक्स
वर भारतातील ५००० शैक्षणिक संस्थांची यादी त्यांचा इतिवृत्त (प्रोफाइल), तेथे उपलब्ध
असणार्या सुविधा, तेथील विविध शैक्षणिक अभ्यासक्रम
व ते शिकविणार्या प्राध्यापकांची माहिती, तेथील नोकरभरतीची
(प्लेसमेंटस्) माहिती, शेवटच्या तुकडीतील विद्यार्थ्यां पैकी सर्वात जास्त पगार (पॅकेज)
मिळविणार्या विद्यार्थ्यांची नावे व त्यांचे पॅकेज व ते पॅकेज
देणार्या कंपनीचे नाव, त्या संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या
विद्यार्थ्यांची त्या संस्थेबद्दलची मते, त्या संस्थेच्या आवाराची (कॅम्पसची) छायाचित्रे
व विडियोज्, त्या संस्थांचा गुणानूक्रम (रॅंक) इत्यादी आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिंगलबॉक्स वर आपल्याला या सर्व अभ्यासक्रमांच्या
नमुना परीक्षा (मॉक टेस्टस्) देता येतात. त्यामुळे परीक्षाची रंगीत तालिम करण्याचे
ही अत्यंत उपयुक्त साधन आहे. या मॉक टेस्टस्मध्ये आपण आपल्याला सोडविता न आलेल्या प्रश्नांना
बूकमार्क करु शकतो ज्यामुळे आपल्याला त्या प्रश्नांचा परीक्षा
संपल्या नंतर ही विषेश अभ्यास करता येतो. या परीक्षा ज्यावेळेस आपण ऑनलाईन देतो त्यावेळेस
आपल्याला त्याचा निकालही परीक्षा संपल्यावर लगेचच मिळतो.
मिंगलबॉक्स वर प्रत्येक अभ्यासक्रमांच्या प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाशी
निगडीत नोट्स उपलब्ध आहेत ज्या आपण डाउनलोड करु शकतो. शिवाय या साईटवर शिक्षण तज्ञांच्या
प्रोफाईलस् असतात. त्या बघून आपण त्यातील तज्ञांची निवड करुन त्यांच्याशी व येथील इतर
नेटकरांबरोबर विचार-विनिमय (फोरम डिस्कशन) करु शकतो. याच तज्ञांकडून आपल्याला ह्या
परीक्षांच्या वेळेला होणार्या मुलाखत
व सांघीक चर्चा (ग्रुप डिस्कशन) बद्दल मार्गदर्शन ही मिळू शकते.
त्याशिवाय फक्त आपले नाव व ईमेल आय.डी. या संकेतस्थळांना दिले की आपल्याला त्यांच्या
कडून नियमित मोफत समाचारपत्र (न्यूजलेटरस्) पाठविले जाते ज्यामध्ये परीक्षांच्या व
दाखल्यांच्या (अॅडमिशनच्या) आगाऊ सूचना, शिष्यवृत्तींच्या सूचना व माहिती असते. मिंगलबॉक्स
वर आपल्याला ह्या सर्व परीक्षांचे निकाल ही थेट कळतात. इतर पदवी परीक्षांपैकी विज्ञान,
वाणिज्य व कला या शाखांमधिल वैमानिकशास्त्र, जीवतंत्रशास्त्र (बायोटेक्नोलॉजी), वैद्यकिय
संशोधन, बी.सी.ए. / एम.सी.ए., हार्डवेअर, सॉफ्टवेअर, बी.बी.ए / बी.बी.एम, हॉटेल व्यवस्थापन,
बँका व अर्थशास्त्र, प्रसारमाध्यम, रिटेल, प्रवास व्यवस्थापन,
कॉलसेंटर प्रशिक्षण, अॅनिमेशन, फॅशन डिझाइन, व इतर बाह्य
शिक्षण अभ्यासक्रम शिकविणार्या संस्था व विद्यापीठांची नावं,
पत्ते, संर्पक व त्या संस्थेबद्दलचा इतिवृत्त (प्रोफाइल) मिंगलबॉक्स वर आपल्याला मिळतो.
http://nptel.iitm.ac.in या साइटवर आपल्याला १० विषयांमधील उदा: स्थापत्यशास्त्र (सिव्हील इंजिनीयरींग), संगणकशास्त्र, विद्युतशास्त्र (इलेक्ट्रीकल इंजिनीयरींग), इलेक्ट्रोनिक्स व संर्पकशास्त्र, यांत्रिकशास्त्र (मेकॅनिकल इंजिनीयरींग), समुद्रशास्त्र, खाणशास्त्र (माइनिंग इंजिनीयरींग), व धातुशास्त्र (मेटालर्जी), जीवतंत्रशास्त्र (बायोटेक्नोलॉजी),
व्यवस्थापन, इत्यादी मधिल जवळ-जवळ ३५ उप-विषयांचे विडियोज् उपलब्ध आहेत ज्यात
आय.आय.टी. च्या प्राध्यापकांचे शिकवणी वर्ग (लेक्चर्स) व उदाहरणांसहित स्पष्टीकरणं
आहेत.
Online Education is the need of time and I think the people who are training the youth about the online learning and educating other are the real hero of nation.
ReplyDelete